Breaking News Updates of Pune

मोदी सरकार देतय स्वस्तात सोन ; ‘अशी’ करा खरेदी

नवी दिल्ली मोदी सरकारने आजपासून (सोमवार) स्वस्त सोनं खरेदी करण्याची दुसरी संधी उपलब्ध करून दिली आहे. यासाठी जर ऑनलाइन प्रणालीचा वापर केल्या तर यात आणखी सूट मिळणार आहे.

सॉव्हरेन गोल्ड बाँड खरेदीसाठीचा दुसरा टप्पा 11 मेपासून सुरू होणार असल्याची बातमी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने दिली आहे.

सॉव्हरेन गोल्डची बॉण्ड ची विक्री बँक, स्टॉक होल्डिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड, निवडण्यात आलेले पोस्ट आणि एनएसई तसच बीएसईच्या माध्यमातून होते.

भारत बुलियन अँड असोसिएशन लिमिटेडकडून गेल्या 3 दिवसात 999 शुद्धतेच्या सोन्याच्या देण्यात आलेल्या किंमतीच्या आधारे या बाँडच्या किंमती ठरतात. सॉव्हरेन गोल्ड बाँड 20 एप्रिल ते 2 सप्टेंबरपर्यंत एकूण सहा टप्प्यांमध्ये जारी करण्यात येणार आहेत.

20 एप्रिल ते 24 एप्रिल दरम्यान हे गोल्ड बाँड खरेदी करण्याचा पहिला टप्पा पार पडला. आता 11 मे ते 15 मेपर्यंत असणाऱ्या दुसऱ्या टप्प्यामध्ये स्वस्त सोनेखरेदी करता येणार आहे.

याकरता प्रति ग्रॅम सोन्याची किंमत 4,590 रुपये ठरवण्यात आली आहे. म्हणजे या योजनेतून तुम्हाला प्रति तोळा 45900 किंमतीने सोने मिळेल.

दुसऱ्या सिरीजमध्ये तुम्ही आजपासून अर्थात 11 मेपासून ते 15 मे दरम्यान गोल्ड सॉव्हरेन बाँड्सचे सब्सक्रिप्शन घेऊ शकता. या बाँडचा हा हप्ता 19 मे रोजी जारी करण्यात येईल त्याचप्रमाणे ऑनलाइन पेमेंट केल्यास प्रत्येक बाँडमधील प्रति ग्रॅम सोन्यावर 50 रुपयांची सूट देण्यात आली आहे.

म्हणजे ऑनलाइन अर्ज करून सोने खरेदी केल्यास प्रति ग्रॅम 4,540 रुपयांनी सोने खरेदी करता येईल. या योजनेअंतर्गत कमीत कमी 1 ग्रॅम सोन्याची गुंतवणूक करता येऊ शकेल.

यामध्ये गुंतवणूक करताना तुम्ही एका आर्थिक वर्षामध्ये 500 ग्रॅम सोन्याचे बाँड खरेदी करू शकता. कमीतकमी गुंतवणूक 1 ग्रॅमची आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.