पंतप्रधान मोदींनी अखिलेश यादव अन राहुल गांधींची उडवली खिल्ली
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काँग्रेसचे नेते राहुल गांधी आणि समाजवादी पार्टीचे प्रमुख अखिलेश यादव यांच्यावर जोरदार निशाणा साधला.पंतप्रधान मोदी म्हणाले की, लोकसभा निवडणुका पार पडल्यानंतर विदेश दौऱ्यासाठी यांचे तिकीट बुक झाले आहे.फतेहपूर येथे आज(१७ मे) पार पडलेल्या सभेत पंतप्रधान मोदी बोलत होते.
पंतप्रधान मोदी म्हणाले की, हाताच्या पंजाचे आणि सायकलचे स्वप्न तुटले आहे, खटाखट-खटाखट, आता ४ जून नंतर हे प्लॅनिंग करत आहेत की, पराभवाचे खापर कोणावर फोडायचे?, खटाखट-खटाखट, मला कोणीतरी सांगितले की, यांच्या विदेशी दौऱ्याचे तिकीटही बुक झाले आहे, खटाखट-खटाखट.पंतप्रधान मोदी पुढे म्हणाले, उत्तर प्रदेशामध्ये काँग्रेसचे अस्तित्व नाही.संपूर्ण काँग्रेस एका कुटुंबांच्या सन्मानाचे रक्षण करण्यात गुंतली आहे.समाजवादी पार्टीवर टीका करताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, सपाचे माफिया प्रेम अजूनही संपलेले नाही, त्यांच्या पार्टीचे प्रमुख माफियांच्या कबरीवर फतीया वाचत आहेत.
‘सपा, काँग्रेस सत्तेत आले तर, रामलल्ला पुन्हा तंबूत जाणार’
टी-२० वर्ल्डकप भारत-पाक सामन्यांचे तिकीट २ लाखात!
भारत जोडो यात्रेत राहुल गांधी यांना भेटण्यासाठी पैसे मागितले!
ममता म्हणतात, ‘तृणमूल इंडी आघाडीचा भाग’, पण काँग्रेसला विश्वास नाही!
डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी धर्माच्या आधारावर आरक्षणाला कडाडून विरोध केला होता.तर ज्या ठिकाणी काँग्रेसचे सरकार आहे, त्याठिकाणी हे लोक दलित आणि मागासवर्गीयांचे आरक्षण कमी करून मुस्लिमांना आरक्षण देत आहेत.आता या लोकांना राज्यघटना बदलून एससी, एसटी, ओबीसीचे संपूर्ण आरक्षण मुस्लिमांना द्यायचे आहे, असे पंतप्रधान मोदी म्हणाले.