युवतीसह दोघांना मारहाण केल्याप्रकरणाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिस यंत्रणा खडबड़ून जागी झाली. पोलिसांनी एका रिक्षाचालकासह ११ जणांना अटक केली.

काय घडले ?

रिक्षाचालकाने छेड काढल्यानंतर तरुणीने मदतीसाठी दोघा मित्रांना बोलावले; मात्र जमावाने या तिघांनाच बेदम मारहाण केली होती. शुक्रवारी घडलेल्या घटनेचा व्हिडिओ ‘सोशल मीडिया’वर तुफान व्हायरल झाला आहे.

नेमकं प्रकरण काय ?

संबंधित तरुणीने उल्हासनगरहून डोंबिवलीला जाण्यासाठी रिक्षा पकडली होती. रिक्षाने प्रवास करत असताना रिक्षाचालकाने तिची छेड काढली. यानंतर तरुणीने आपल्या दोन मित्रांना याबाबतची माहिती दिली आणि त्यांना तातडीने एका ठिकाणी येण्यास सांगितले.

Advertisement

तिचे दोन्ही मित्र कल्याण पूर्वेकडील कोळसेवाडी परिसरात पोहोचले. या वेळी त्यांचा रिक्षाचालकाशी वाद झाला. वादावादी सुरु असताना उपस्थित जमावाने तरुणीसह तिच्या दोघा मित्रांनाच मारहाण सुरू केली.

पट्ट्याने तिघांनाही बेदम मारहाण होत असल्याचा व्हिडिओ समोर आला. गैरसमजातून ही मारहाण झाल्याचा दावा केला जात होता. त्यानंतर उशिरा या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला. अखेर रिक्षा चालकासह ११ जणांना अटक करण्यात आली आहे.

 

Advertisement