Punelive24.com
Latest News, Videos, Web Stories and Photos from Pune

आगीतून १३ जणांची सुटका,मोठा अनर्थ टळला !

पुणेः आगीच्या घटना घडल्यानंतर अग्नीशमन दल आणि पोलिस वेळेवर येत नसल्याचे आरोप अनेकदा होतात; परंतु हिंजवडी येथील माण रस्त्यावर लागलेल्या आगीच्या वेळी अग्नीशमन दलाच्या जवान देवासारखे धावून आले आणि ११ जणांचे प्राण वाचविले.

धुरामुळे कोंडला होता श्वास :- एका सोसायटीतील इमारतीच्या चौथ्या आणि पाचव्या मजल्यावर धुराचे प्रचंड लोट पसरल्याने एकच खळबळ उडाली, जवळच असलेल्या अग्निशमन दलाला याची माहिती मिळताच त्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन परिस्थिती आटोक्यात आणल्याने मोठा अनर्थ टळला.

इमारतीच्या चौथ्या मजल्यावर लिफ्टजवळील मोकळ्या भागात असलेल्या विद्युत केबल्सला अचानक आग लागल्याने परिसरात धूर आणि आगीचे लोळ पसरले. या वेळी धुरामुळे घाबरलेल्या परिस्थितीत तेरा नागरिक आतमध्ये अडकल्याने गंभीर परिस्थिती निर्माण झाली होती.

Advertisement

नागरिकांनी दाखविले प्रसंगावधान :- बारा मजली इमारत असल्याने वरील मजल्यावरील सर्व नागरिक सुरक्षेच्या कारणास्तव टेरेसवरून बाजूच्या इमारतीमध्ये प्रवेश करून खाली आले.

अचानक लागलेल्या आगीत सुदैवाने जीवितहानी झाली नाही; मात्र आगीच्या मजल्यावर मोठया प्रमाणावर आर्थिक नुकसान झाल्याचे समजते. आगीचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही; मात्र शॉर्ट सर्किटमुळे आग लागली असावी असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

मोठा अनर्थ टळला… मुळशीतील पिरंगुट एमआयडीसी आग प्रकरण ताजे असतानाच, माण रस्त्यावर असलेल्या बारा मजली रहिवाशी सोसायटीत आग लागल्याने परिसरात मोठी घबराट पसरली होती. हवेत धुराचे लोट पसरल्याने सोसायटीमध्ये गोंधळ उडाला होता. परिस्थिती तात्काळ आटोक्यात आल्याने मोठा अनर्थ टळला.

Advertisement
Leave a comment