Breaking News Updates of Pune

पुणे विभागातून २ लाख ६ हजार प्रवाशांना घेऊन १५४ विशेष रेल्वेगाड्या रवाना

पुणे, दि. 7 : लॉकडाऊनमुळे अडकलेल्या मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, तामिळनाडू, राजस्थान, बिहार, हिमाचल, झारखंड, छत्तीसगड, जम्मू आणि काश्मिर, मणिपूर,

आसाम,ओरिसा, पश्चिम बंगाल व मिझोराम या राज्यामधील 2 लाख 6 हजार 8 प्रवाशांना घेऊन पुणे विभागातून 7 जून 2020 अखेर 154 विशेष रेल्वेगाड्या रवाना झाल्याची माहिती विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी दिली. Maha Info Corona Website डॉ.म्हैसेकर म्हणाले,

पुणे विभागातून मध्य प्रदेशसाठी 15, उत्तर प्रदेशसाठी 62, उत्तराखंडसाठी 2, तामिळनाडूसाठी 2, राजस्थानसाठी 5, बिहारसाठी 36, हिमाचल प्रदेशसाठी 1, झारखंडसाठी 8, छत्तीसगडसाठी 5, जम्मू आणि काश्मीरसाठी 1, मणिपूरसाठी 1, आसामसाठी 1, ओरिसासाठी 2, पश्चिम बंगालसाठी 12 आणि मिझोराम 1 अशा एकूण 154 रेल्वेगाड्या 2 लाख 6 हजार 8 प्रवाशांना घेऊन रवाना झाल्या आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.