10वी पाससाठी 1553 नोकऱ्या, लवकरच करा अर्ज

0
22

सध्या लाखो तरुण नोकरीच्या शोधात आहेत. जर तुम्ही देखील त्यापैकी एक असाल तर तुमच्यासाठी महत्वाची बातमी आहे. कारण ज्युनियर लाइनमनच्या पदावर भरती केली जाणार आहे. त्या पदासाठी 1553 रिक्त पदांची भरती होणार आहे. कनिष्ठ लाइनमन पदासाठी अर्ज भरण्यास ८ मार्चपासून सुरुवात होणार असून शेवटची तारीख २८ मार्च आहे.

ज्युनिअर लाइनमनच्या नोकरीसाठी तुमचे शिक्षण किमान 10वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. व वय १८ वर्षे आणि कमाल ३५ वर्षे असणे गरजेचे आहे. SC, ST, ST, BC, EWS प्रवर्गातील उमेदवारांना कमाल वयोमर्यादेत 5 वर्षांची सूट मिळेल.

ज्युनियर लाइनमन पदासाठी फॉर्म भरायचा असेल तर २०० रुपये शुल्क भरावे लागेल. यासोबतच 120 रुपये परीक्षा शुल्कही भरावे लागणार आहे. अशाप्रकारे, फी भरण्यासाठी एकूण 320 रुपये शुल्क आहे. तथापि, जर तुम्ही SC/ST/BC समुदायाचे असाल तर तुम्हाला अर्जाची फी भरावी लागणार नाही .ज्युनियर लाइनमनच्या पदावरील भरतीसाठी ऑनलाइन फॉर्म TSSPDCL वेबसाइट tssouthernpower.cgg.gov.in वर भेट देऊन भरता येईल. याशिवाय तुम्ही https://www.tssouthernpower.com/ या लिंकवर जाऊन थेट फॉर्म सबमिट करू शकता.

कनिष्ठ लाईनमन पदासाठी भरती झाल्यानंतर वेतन

जर तुम्ही कनिष्ठ लाइनमनच्या पदावर भरती झालात, तर तुमची वेतनश्रेणी रु. 24340 – 480 – 25780 –695 – 29255 – 910 –33805 – 1120 – 39405 असेल. म्हणजे सुरुवातीला तुम्हाला सुमारे 39000 पगार मिळेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here