ahmednagarlive24
Breaking News Updates Of Ahmednagar

पुणे जिल्ह्यात ऑक्सिजनचे १६ प्रकल्प कार्यान्वित

कोरोनाची दुसरी लाट ओसरली नसतनाच तिसरी लाट सुरू होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. संभाव्य तिस-या लाटेला सामोरे जाण्यासाठी पुणे जिल्ह्यात १६ ऑक्सिजन प्रकल्प कार्यान्वित करण्यात आले आहेत.

ऑक्सिजन उत्पादकतेत भर

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेवेळी ऑक्सिजनचा प्रचंड तुटवडा निर्माण झाला होता. हा अनुभव पाहता पुणे शहर कार्यक्षेत्रात 6, पिंपरी-चिंचवड कार्यक्षेत्रात 2, तर ग्रामीणमध्ये 8 प्लांट कार्यान्वित झाले आहेत.

त्यामुळे 12 हजार 994 टन ऑक्सिजन उत्पादन क्षमता वाढली आहे. आणखी 43 प्लांट उभारण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. हे सर्व प्लांट कार्यान्वित झाल्यावर जिल्ह्याच्या ऑक्सिजन उत्पादकतेत मोठी भर पडेल.

पर्यटन स्थळांवर नो एन्ट्री कायम

एकीकडे कोरोनाची दुसरी लाट ओसरत असल्याचे चित्र पाहायला मिळत असले, तरी दररोज कोरोना रुग्णाच्या संख्येमध्ये शंभरीचा टप्पा गाठला जात आहे.

दुसरीकडे तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तवली जात असताना जिल्यात निर्बंध लागू करण्यात आले आहेत. सध्या जिल्ह्याचा स्तर तिसऱ्या टप्यात असल्याने निर्बंध शिथिल केले गेले नाहीत.

पर्यटन स्थळांवर नो एन्ट्री कायम आहे. त्याबाबतचा निर्णय मुख्यमंत्री घेतील, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.

 

You might also like
2 li