file photo

पुणेः जिल्हा परिषद आरोग्य विभागाकडून कोरोना संसर्गाची साखळी ब्रेक करण्यासाठी विविध सर्वेक्षणाच्या माध्यमातून प्रयत्न केला जात आहे.

गेल्या दहा दिवसांत २० हजार ३६१ जणांचे सर्वेक्षण करण्यात आले होते. त्यापैकी १९२ जणांना कोरोनाचा संसर्ग असल्याने ते सुपर स्प्रेडर असल्याचे निदान झाले.

दोन महिन्यांपासून सर्वेक्षण

पुणे जिल्ह्यातील सर्व तालुक्यांामध्ये गेल्या दोन महिन्यांपासून सुपर स्प्रेडर सर्वेक्षण सुरू असून त्यात सुपर स्प्रेडरमुळे जिल्ह्यातील बाधितांची संख्या वाढत असल्याचे दिसत होते.

Advertisement

त्यामध्ये किराणा दुकानदार, भाजी विक्रेते, व्यापारी म्हणजे ज्या व्यक्तींेचा अनेक व्यक्तींयबरोबर संपर्कात येते. त्यामुळे अशा व्यक्ती सुपर स्प्रेडर ठरते.

अशा व्यक्तीमुळे लागण होणाऱ्यांची संख्या आधी वाढत असून त्यांना रोखण्यासाठी सर्वेक्षण करण्याचा निर्णय जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने घेतला.

बाधितांचे प्रमाण कमी

आरोग्य विभागाने या सुपर स्प्रेडर सर्वेक्षणाला सुरुवात केली. जिल्ह्यात १२ ते २६ मेच्या सर्वेक्षणात २७ हजार ६६३ सुपर स्प्रेडर सर्वेक्षणातून ५६९ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला; तर आता जून महिन्यात ८ ते १६ जूनदरम्यानच्या सर्वेक्षणात १९२ सुपर स्प्रेडर रुग्ण सापडले आहेत.

Advertisement

गेल्या महिन्याच्या तुलनेत बाधित रुग्ण सापडण्याचे प्रमाण कमी झाले आहे. प्रत्येक आठवड्याला सरासरी एक ते दीड हजारांच्या जवळपास बाधित रुग्ण सापडत होते.

मात्र, सततच्या सर्वेक्षणामुळे ही संख्या आता घटत आहे, असा दावा जिल्हा आरोग्य विभागाने केला आहे.

Advertisement