नोटाबंदीच्या काळात जिल्हा बँकेने बदलून दिलेल्या ५७६ कोटी रुपयांपैकी ५५४ कोटी रुपये बदलून मिळाले असले, तरी अजूनही २२ कोटी २५ लाख रुपयांच्या नोटा अजूनही बदलून मिळालेल्या नाहीत.

नोटांचा कचरा

केंद्र सरकारने नोव्हेंबर २०१६ मध्ये एक हजार आणि पाचशे रुपयांच्या जुन्या नोटा भारतीय चलनातून बाद केल्या. हा निर्णय झाला अन्‌ या निर्णयापूर्वी प्रत्येकाचा जीव की प्राण असलेल्या या नोटांचा क्षणात कचरा झाला.

जुन्या नोटा म्हणजे मूल्यहीन अशी या नोटांची अवस्था झाली. केंद्र सरकारने या नोटा बदलून देण्यासाठी काही कालावधी दिल्याने, दिलासाही मिळाला; पण याला अपवाद ठरली ही पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅक (पीडीसीसी).

Advertisement

या बॅंकेकडे जमा झालेल्या तब्बल तब्बल ५७६ कोटी रुपये मूल्य असलेल्या जुन्या नोटा सुरवातीची सात महिने बॅंकेतच पडून होत्या. महत प्रयत्नांनंतर यापैकी ५५४ कोटी रुपयांच्या नोटा बदलून मिळाल्या.

तोपर्यंत बॅंकेचे ५० कोटींचे आर्थिक नुकसान झालेले. याच नोटांपैकी शिल्लक असलेल्या २२ कोटी २५ लाख रुपयांच्या जुन्या नोटा अद्यापही बॅंकेला बदलून मिळू शकल्या नाहीत.

चूक केंद्राची, शिक्षा जिल्हा बँकेला

बॅंकेने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली; परंतु कोरोनामुळे अंतिम निकाल बाकी आहे. यामुळं बॅंकेने या जुन्या नोटा चक्क लॉकरमध्ये ठेवून त्यांचा वाळवी व अन्य किडीपासून बचाव केला जात आहे.

Advertisement

आज ना उद्या या नोटा बदलून मिळतील, या आशेने काळजाच्या तुकड्याप्रमाणे या जुन्या नोटांची जपणूक केली जात होती.

या नोटांच्या देखभालीसाठी बॅंकेचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना तारेवरची कसरत करावी लागत लागत आहे. चूक केंद्र सरकारची आणि शिक्षा मात्र जिल्हा बॅंकेला भोगावी लागत आहे.

ढोबळ नफ्यावर परिणाम

जुन्या नोटांमुळे बॅंकेला सुमारे ७० ते ८० कोटी रुपयांचे आर्थिक झळ सोसावी लागली आहे; परंतु बॅंकेची आर्थिक स्थिती चांगली असल्याने ही झळ सोसता आली; पण याचा ढोबळ नफ्यावर मोठा परिणाम झाला.

Advertisement

केंद्र सरकारने ८ नोव्हेंबर २०१६ ला एक हजार व पाचशे रुपयांच्या जुन्या नोटा चलनातून बाद करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजेच ९ नोव्हेंबरला सर्व बॅंकांना सुट्टी देण्यात आली.

या सुट्टीमुळे आठ नोव्हेंबरला जमा झालेल्या जुन्या नोटा जमा करण्यासाठी बॅंकेचे अधिकारी दहा नोव्हेंबर रोजी राष्ट्रीयकृत बॅंकांमध्ये या नोटा जमा करण्यासाठी गेले; परंतु आमच्याकडे जुन्या नोटा ठेवण्यासाठी जागा उपलब्ध नसल्याचे कारण पुढे करत या बॅंकांनी हे पैसे जमा करून घेतले नाहीत. तसे त्यांनी लेखी पत्र दिले आहे.

 

Advertisement