पिंपरी चिंचवड महापालिकेतील कर्मचाऱ्यांच्या वारसांना प्रत्येकी २५ लाख रुपयांच्या धनादेशाचे वाटप महापौर उषा ढोरे यांच्या हस्ते करण्यात आले.
हे होते उपस्थित
या वेळी सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके, जैव विविधता व्यवस्थापन समिती अध्यक्ष उषा मुंढे, पिंपरी चिंचवड शहर महिला मोर्चा अध्यक्ष उज्वला गावडे, कामगार कल्याण अधिकारी प्रमोद जगताप, कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष अंबर चिंचवडे, माहिती व जनसंपर्क विभागाचे प्रफुल्ल पुराणिक, कामगार कल्याण विभागाच्या माया वाकडे आदी उपस्थित होते.
वारसांच्या दुखात महापालिका सहभागी
महापालिका सेवेतील कोरोनामुळे मृत झालेल्या कर्मचा-यांच्या वारसांच्या दु:खात महानगरपालिका सहभागी आहे, असे प्रतिपादन महापौर उषा ढोरे यांनी केले. त्या म्हणाल्या, ‘‘अचानक उद्भवलेल्या कोरोना विषाणु संसगार्मुळे देशात लाखो जणांचा मृत्यू झाला.
महानगरपालिकेतील काही कर्मचारी बंधू भगिनींचादेखील कोरोनामुळे मृत्यु झालेला आहे. आमदार लक्ष्मण जगताप, महेश लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पदाधिका-यांसमवेत चर्चा करून मयत कर्मचा-यांच्या वारसास २५ लाख इतकी मदतीची रक्कम देण्याचा निर्णय झाला.
या वारसांना मिळाली मदत
अकबर सय्यद, रमेश जगताप, राजेंद्र तुपे, काळुराम नलावडे, विनायक फापाळे, अलका साळवे, मोहन डिगोळे, रामदास राखपसरे, पंडीत कुटे