पुण्यामध्ये लग्नाचे आमिष दाखवत तब्बल 255 तरुणींना गंडवणाऱ्या भामट्यांच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. हे दोन तरुण ब्रँडेड गाड्या व महागड्या वस्तू दाखवून मुलींना स्वतःच्या जाळ्यामध्ये ओढत होते.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हे आरोपी मॅट्रोमोनियल वेबसाईटवरुन तरुणींशी ओळख निर्माण करायचे. व त्यानंतर चॅटिंग , ब्रँडेड गाडीमधून तरुणीला फिरवणे,व भविष्यचे स्वप्न दाखवत तरुणींकडून लाखो रुपयांची मागणी करणे. त्यानंतर पैसे भेटल्यानंतर त्या तरुणीसोबत बोलणे कमी करणे .

व मोबाइल स्विच ऑफ करणे, व पसार होणे . असे या चोरांचे आधीच ठरलेले असायचे .तसेच हे तरुण प्रत्येक ठिकाणी वेगवेगळे नाव वापरात असत. या दोन्ही आरोपींनी मिळून पुणे, बंगळुरु आणि गुडगाव येथील एकूण 255 मुलींना फसवल्याचे समोर आले आहे.

Advertisement

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी निशांत रमेशचंद्र नंदवाना हा पुण्यात अधितांश अग्निहोत्री, बंगळुरु येथे अभय कश्यप आणि गुरगावमध्ये आधव अग्निहोत्री अशी बनावट नावे वापरून तरुणींना फसवत होता.

तर दुसरा आरोपी विशाल हर्षद शर्मा हा पुण्यात आश्विक शुक्ला, बंगलोर येथे अथर्वन तिवारी आणि गुरगावमध्ये अव्यागृह शुक्ला, रुद्रान्स शुक्ला, देवांश शुक्ला किंवा अचैत्य शुक्ला नावाने तरुणींना फसवत असल्याची माहिती पोलीस तपासात समोर आली आहे.

या फसवणुकी दरम्यान अनेक तरुणींचे लैंगिक शोषण केले असण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. आरोपीच्या विरोधात वाकड पोलिसांत तक्रार आल्यानंतर तपासाची चक्रे वेगवान फिरवण्यात आली.

Advertisement

बंगळुरू येथून सहाय्यक पोलीस निरीक्षक अभिजित जाधव यांच्या पथकाने आरोपींना बेड्या ठोकल्या. आरोपी हे वेगवेगळ्या नावाने राहात असल्याचं समोर आले आहे.