एका इमारतीच्या छतावर लोखंडी पाट्यापासून तयार केलेल्या २६ तलवारी बाळगणा-यास पोलिसांनी अटक केली आहे.
सह्याद्रीनगर परिसरातील घटना
गुन्हे शाखेच्या दरोडा व वाहनचोरी विरोधी पथकातील पोलिस अधिकारी व कर्मचारी सहकारनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील तीन हत्ती चौक ते तळजाई पठाराकडे जाणाऱ्या रस्त्यावर गस्त घालत होते.
त्या वेळी धनकवडीतील सह्याद्रीनगर परिसरातील एक फायनान्स ऑफिस असलेल्या इमारतीच्या छतावर प्रतीक भोसले नावाच्या तरुणाने पांढऱ्या पोत्यामध्ये हत्यारे भरून ठेवली आहेत.
आरोपी फायनान्स कंपनीत
लोखंडी पाट्याच्या वेगवेगळ्या प्रकारच्या तब्बल २६ तलवारी बाळगणाऱ्यास गुन्हे शाखेच्या दरोडा व वाहनचोरी विरोधी पथकाने बेड्या ठोकल्या.
आरोपी एका फायनान्स कंपनीमध्ये कामाला असताना कार्यालय असलेल्या इमारतीच्याच छतावर तलवारी ठेवल्या होत्या.
प्रतीक ज्ञानेश्वर भोसले (वय 33, रा. पार्श्वनाथ नगर, जितोजी अपार्टमेंट, बिबवेवाडी) असे अटक केलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे.
सापळा रचून अटक
वरिष्ठ पोलिस निरीक्षक शिल्पा चव्हाण यांनी दिलेल्या आदेशानुसार, पोलिसांच्या पथकाने सह्याद्रीनगरमधील शिवगंगा अपार्टमेंटमध्ये सापळा रचून प्रतीक भोसले यास अटक केली.
पोलिसांनी त्याच्याकडून पांढरे पोते ताब्यात घेऊन त्याची तपासणी केली, तेव्हा पोत्यामध्ये लोखंडी पाट्याच्या वेगवेगळ्या प्रकारच्या तब्बल २६ तलवारी पोलिसांच्या निदर्शनास आल्या.
पोलिसांनी त्याच्याविरुद्ध सहकारनगर पोलिस ठाण्यात भारतीय हत्यार कायदा, महाराष्ट्र पोलिस अधिनियमान्वये गुन्हा दाखल करून त्यास अटक केली.