Punelive24.com
Latest News, Videos, Web Stories and Photos from Pune

आर्यन खानसह 3 आरोपींना ‘या’ तारखेपर्यंत कोठडी ! तपासात धक्कादायक माहिती समोर

नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने शनिवारी मुंबईत सुरू असलेल्या एका हायप्रोफाईल रेव्ह पार्टीवर छापा टाकला. याप्रकरणी 8 जणांना ताब्यात घेण्यात आलं होतं. या सर्वांची रविवारी संध्याकाळपर्यंत चौकशी करण्यात आली

त्यानंतर शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानसह सर्व आरोपींना अटक करण्यात आली. आज पुन्हा या प्रकरणी सुनावणी करण्यात आली.

यावेळी आर्यन खानसह 3 आरोपींना 7 ऑक्टोबरपर्यंत एनसीबी कोठडी सुनावण्यात आली आहे. आर्यन खान, अरबाझ मर्चंट आणि मुनमुन धमेचा या तिघांना दिलासा मिळालेला नाही.

Advertisement

आर्यनने चौकशी दरम्यान कोठडीत कबूल केले आहे की तो गेल्या चार वर्षांपासून ड्रग्ज घेत होता. त्याने केवळ भारतातच नाही तर दुबई, यूके आणि इतर अनेक देशांतही अंमली पदार्थांचे सेवन केले आहे.

चौकशीत असे समोर आले आहे की अरबाज मर्चंट देखील आर्यनसोबत सतत ड्रग्ज घेत होता. चौकशीदरम्यान आर्यन सतत रडत असल्याचेही समोर आले आहे.

एनसीबीने आर्यनला फोनवर शाहरुखशी बोलण्याचीही मुभा दिली होती. शाहरुख खान आणि गौरी खान यांना त्यांचा मुलगा ड्रग्स घेत असल्याची माहिती असल्याचंही सूत्रांनी सांगितलं.

Advertisement

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शाहरुखच्या ‘मन्नत’ या बंगल्यातही सर्च ऑपरेशनसाठीही टीम तयार आहे. आर्यनच्या अटकेनंतर, कायदेशीर प्रक्रियेचा एक भाग म्हणून,

एनसीबीने आर्यनला त्याच्या लँडलाईन फोनवरुन शाहरुख खानशी सुमारे 2 मिनिटे बोलण्यास दिले. मिळालेल्या माहितीनुसार, आर्यन खान चौकशीदरम्यान सतत रडत होता. त्याने भारताबाहेर यूके ,दुबई आणि इतर देशांमध्ये ड्रग्सचे सेवन केले आहे.

Advertisement
Leave a comment