फेसबुकमधून ओळख वाढवत कस्टमध्ये अडकलेले पार्सल सोडविण्यासाठी वेगवेगळी कारणे सांगून बारा वेगवेगळ्या खात्यात तब्बल ४३ लाख ७१ हजार रुपये भरण्यास सांगून फसवणूक केल्याप्रकरणी सायबर पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आला.

याप्रकरणी फेसबुक अकाऊंटधारक स्टीफन बेनजा व मोबाईल धारक व बँकेच्या खातेधारकांवर गुन्हा दाखल केला.
बिबवेवाडीतील एका महिलेला गेल्या आठवड्यात संशयित आरोपींनी फेसबुकवर फ्रेंडरिक्वेस्ट पाठविली.

त्यानंतर ओळख वाढवत आरोपीने मोबाईल क्रमांक दिला. त्यांच्या मुलीसाठी पाठवलेले गिफ्ट ताब्यात घेण्यासाठी फिर्यादीकडून ४३ लाख ७१ हजार रुपयांची मागणी करून फसवणूक केली.