मुंबई – सध्या विधानसभेचं पावसाळी अधिवेशन (Monsoon Assembly Session) सुरु आहे. मात्र, आजचं कामकाज सुरु होण्याआधीच सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये (Oppositions) जोरदार राडा झाल्याचं पाहायला मिळालं आहे. हा वाद इतका वाढला कि नंतर विरोधक आणि सत्ताधारी नेत्यांमध्ये धक्काबुक्की करत आई-बहिणींवरून शिवीगाळ देखील करण्यात आली आहे. सध्या हा वादाचा व्हिडिओ (video) सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

पावसाळी अधिवेशन (Monsoon Assembly Session) सुरू झाल्यापासून विरोधी पक्षातील नेते विधानभवनाच्या पायऱ्यांवर उभं राहून जोरदार आंदोलन करत आहेत.

’50 खोके, एकदम ओक्के’ यासारख्या घोषणा देऊन महाविकास आघाडीनं विधानसभा परिसर दणाणून सोडला आहे. यानंतर आज सत्ताधारी पक्षातील नेत्यांनीदेखील याच ठिकाणी आंदोलन केलं आहे.

आणि यावेळी जोरदार राडा झाल्याचं चित्र पाहायला मिळालं. मात्र, या राड्याची सुरुवात नेमकी कशी अन् शेवट कसा झाला? हे आज आम्ही सांगणार आहोत….

अधिवेशन सुरु व्हायला अवघा काही वेळ राहिला होता. सगळे आमदार विधिमंडळाच्या दिशेने येत होते. विरोधक आक्रमक होत सरकार विरोधात आंदोलन करणार आणि घोषणबाजी करणार हे जवळपास निश्चित होतं.

पण आज सत्ताधारी पक्षही तयारीत होता. त्यांनीही विरोधकांना कडाडून विरोध करायचं ठरवलं होतं. त्यानुसार सत्ताधाऱ्यांनीही घोषणाबाजी केली.

अधिवेशनाला सुरूवात झाल्यापासून 50 खोके एकदम ओके! अश्या घोषणा देण्यात येत आहेत. पण या घोषणांवर सत्ताधाऱ्यांचा आवडलेला नाही. त्यामुळे आज विधिमंडळ परिसरात सत्ताधारी-विरोधक आमनेसामने आले.

यावेळी प्रचंड गोधळाचं वातावरण निर्माण झालं. यावेळी सत्ताधारी पक्षानेदेखील आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. लवासातील खोके एकदम ओके! अश्या घोषणा सत्ताधाऱ्यांनीही दिल्या.

यावेळी आमदार एकमेकांच्या अंगावर धावले. एकमेकांच्या अंगावर जाताना काही आमदारांनी शिविगाळ केल्याचा आवाज देखील व्हिडीओमध्ये ऐकू येतोय.

विधानभवनाच्या पायऱ्यांवर अमोल मिटकरी आणि महेश शिंदे एकमेकांच्या अंगावर गेले, धक्काबुक्की केली यावेळी पायऱ्यांसमोर जवळपास 15 ते 20 मिनिटं प्रचंड गोंधळ पाहायला मिळाला.

यावेळी आमदार रोहित पवार यांच्यासह काही आमदारांनी मध्यस्थी केली. राडा झाल्यानंतर अमोल मिटकरी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे तक्रार केली,

सुरुवातीला महेश शिंदे यांनी शिवीगाळ केल्याची तक्रार अमोल मिटकरी यांनी केली आहे. मिटकरी यांनी सत्ताधारी आमदारांनी धमकावलं असल्याचं देखील म्हटलं आहे.

त्यांनी आम्हाला धक्काबुक्की नाही केली, आम्ही त्यांना धक्काबुक्की केली, असंही गोगावले म्हणाले. आम्ही बाळासाहेबांचे शिवसैनिक आहोत, आम्ही डरपोक नाहीत, असं भरत गोगावले म्हणाले.

विरोधी पक्षनेते अजित पवारांनी विरोधी गटातील आमदारांना वेगळीकडे जाण्याच्या सूचना केल्या. तर, दुसरीकडे अमोल मिटकरी प्रसिद्धीसाठी माकड चाळे करत असतात असा आरोप प्रताप सरनाईकांनी केला.