पुणे जिल्ह्यातील तब्बल 260 किलो मीटरचे रस्ते आणि 190 पुलांना पुराचा फटका बसला. महापुरामुळे रस्ते आणि पूल वाहून गेले.

त्यामुळे त्यांच्या दुरुस्तीसाठी तब्बल 55 कोटी 49 लाख रुपयांचा निधी लागणार असल्याचा अंदाज सार्वजनिक बांधकाम विभागाने वर्तवला आहे.

पूल, रस्ते उद्‌ध्वस्त

पूर आणि अतिवृष्टीमुळे झालेलं नुकसान आता समोर येत आहे. अतिवृष्टीमुळे पुणे जिल्ह्यातील केवळ रस्ते आणि पुलांचे 55 कोटींचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

Advertisement

सार्वजनिक बांधकाम विभागाने नुकसानीचा हा अंदाज वर्तवला आहे. पुणे जिल्ह्याच्या घाटमाथ्यावर झालेल्या अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील रस्ते आणि लहान मोठे पूल मोठ्या प्रमाणात उद्ध्वस्त झाले आहेत.

भोर तालुक्याला सर्वाधिक फटका

जिल्ह्यातील जुन्नर, आंबेगाव, खेड, मावळ, मुळशी, भोर आणि वेल्हा या तालुक्यांमध्ये अतिवृष्टीमुळे मोठे नुकसान झालं आहे. पुणे जिल्ह्यात सर्वाधिक फटका भोर तालुक्यातील रस्ते आणि पुलांना बसला आहे.

याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाने प्राथमिक अहवाल तयार केला आहे. यामध्ये तब्बल 260 किलोमीटरचे रस्ते आणि 190 पुलांचे नुकसान झाल्याचं नमूद करण्यात आलं आहे.

Advertisement

कोणत्या तालुक्यात किती नुकसान ?

  1. मुळशी 29.76 किलोमीटरचे रस्ते, 47 पूल
  2. भोर 117.85 किलोमीटरचे रस्ते, 33 पूल
  3. वेल्हा 34.47 किलोमीटरचे रस्ते, 16 पूल
  4. जुन्नर 27.32 किलोमीटरचे रस्ते, 35 पूल
  5. आंबेगाव 24 किलोमीटरचे रस्ते, 31 पूल
  6. मावळ 18.35 किलोमीटरचे रस्ते, 16 पूल
  7. खेड 8. 2 किलोमीटरचे रस्ते 12 पूल

 

 

Advertisement