Punelive24.com
Latest News, Videos, Web Stories and Photos from Pune

६ कोटी लोकांनी दुसरा डोसच घेतलाच नाही !

कोरोनाविरुद्ध सुरू असलेल्या लढाईत भारताच्या सामूहिक प्रयत्नांना ६ कोटी लोक अडसर ठरत आहेत.

देशात ६.१२ कोटी लोकांनी पहिला डोस घेऊन ११२ दिवस झाले तरी दुसरा डोस घेतलेला नाही.

यातील १० टक्के लोक कोव्हॅक्सिन लस घेतलेले आहेत. वास्तविक त्यांनी ४२ दिवसांत दुसरा डोस घ्यायला हवा.

Advertisement

शुक्रवारपर्यंत देशात २२ कोटी लोकांनी दुसरा डोस घेतलेला होता. वास्तविक,

२८ कोटी लोकांना दुसरा डोस दिला जायला हवा होता. कारण,

या लोकांना ११२ दिवसांपूर्वी पहिला डोस दिला गेला आहे.

Advertisement

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या सूत्रांनुसार, दुसरा डोस न घेतलेल्या लोकांची संख्या खूप मोठी आहे.

हे सरकारच्या दृष्टीने कोरोना काळात एक चिंतेचे कारण ठरू लागले आहे.

केरळ व प. बंगालमध्ये ही संख्या अधिक असल्याचे दिसते.

Advertisement
Leave a comment