Punelive24.com
Latest News, Videos, Web Stories and Photos from Pune

बापरे ! लष्करात भरतीच्या आमिषाने अनेकांकडून उकळले ६० लाख ! औरंगाबादच्या एकाविरुद्ध गुन्हा दाखल

बसथांब्यावर थांबलेल्या एका युवतीबरोबर ओळख वाढवून नंतर तिला आपल्या प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिच्याबरोबर विवाह केला. युवतीच्या भावाला लष्करात भरती करण्याचे आमिष दाखवून त्याने दोन लाख रुपये घेतले होते.

युवतीच्या गावातील १५ ते २० युवकांना लष्करात भरतीच्या आमिषाने त्यांच्याकडून पैसे उकळले. त्याने ५० ते ६० लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी योगेश दत्तू गायकवाड (रा. कन्नड, जि. औरंगाबाद) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत एका युवतीने बिबवेवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार युवती मूळची आळंदी देवाची येथील रहिवासी आहे. गेल्या वर्षी युवतीच्या आईला बिबवेवाडीतील एका रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले होते.

त्या वेळी एका बसथांब्यावर ती थांबली होती. बसथांब्याजवळ एक आधारकार्ड पडले होते. तिने आधारकार्डवर नाव पाहिले. जवळच थांबलेल्या योगेश गायकवाडकडे विचारणा केली. तेव्हा आधारकार्ड त्याचेच असल्याचे त्याने युवतीला सांगितले.

त्यानंतर गायकवाडने युवतीबरोबर ओळख वाढविली. तिच्या आईचा विश्वास संपादन केला. युवतीला जाळ्यात ओढून तिच्याबरोबर विवाह केला. युवतीच्या भावाला लष्करात भरती करण्याचे आमिष दाखवून त्याने दोन लाख रुपये घेतले होते.

युवतीच्या गावातील १५ ते २० युवकांना लष्करात भरतीच्या आमिषाने त्यांच्याकडून पैसे उकळले. त्याने ५० ते ६० लाख रुपयांची फसवणूक केल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. सहायक पोलीस निरीक्षक राजेश उसगांवकर तपास करत आहेत.

गायकवाडविरोधात नगर शहरातील तोफखाना पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून या गुन्ह्यात तो पसार आहे. गायकवाड बसथांब्यावर थांबलेल्या युवतींबरोबर ओळख वाढवून त्यांची फसवणूक केल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे.

Leave a comment