Punelive24.com
Latest News, Videos, Web Stories and Photos from Pune

देशात ६२ हजार नवे रुग्ण, २५४२ लोकांचा मृत्यू

नवी दिल्ली : देशात गत २४ तासांमध्ये ६२,२२४ नवे रुग्ण आढळून आले. दिवसभरात १.७ लाख लोकांनी कोरोनावर मात केल्याने तब्बल ७० दिवसांनंतर उपचाराधीन रुग्णांची संख्या ९ लाखांखाली गेल्याची माहिती बुधवारी आरोग्य मंत्रालयाने दिली.

गत २४ तासांमध्ये २,५४२ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याचे यावेळी मंत्रालयाने स्पष्ट केले. बुधवारी सकाळी ८ वाजेपर्यंतच्या आकडेवारीनुसार, गत २४ तासांमध्ये ६२,२२४ नवे रुग्ण आढळल्याने एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या २ कोटी ९६ लाख ३३ हजार १०५ झाली आहे.

दिवसभरात २,५४२ जण दगावल्याने कोरोना बळींचा एकूण आकडा ३,७९,५७३ झाला आहे. दैनंदिन कोरोनाबाधितांच्या संख्येत सातत्याने घट होत असल्याने सध्या उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या ८,६५,४३२ झाली आहे.

त्यामुळे उपचाराधीन रुग्णांची संख्या एकूण कोरोनाबाधितांच्या तुलनेत २.९२ टक्के झाली आहे. गत २४ तासांमध्ये १ लाख ७ हजार ७१० रुग्ण बरे झाल्याने कोरोनामुक्त लोकांची संख्या २ कोटी ८३ लाख ८८ हजार १०० झाली आहे.

Leave a comment