कोरोनामुक्त गावांमध्ये आठवी ते बारावीच्या वर्गाबरोबरच अन्य वर्ग सुरू करण्यासाठी 81 टक्के पालकांनी होकार दर्शवला आहे.

आवश्यक ती खबरदारी घेऊन शाळा सुरू झाल्यास विद्यार्थ्यांना शाळेत पाठविण्याला जवळपास 5 लाख 60 हजार 819 पालकांनी सहमती दर्शवली आहे.

सर्वेक्षणात पालकांचा होकार

राज्यातील कोरोनामुक्त गावांमध्ये उद्यापासून आठवी ते बारावीचे वर्ग सुरू केले जाणार आहेत. महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेचे संचालक दिनकर टेमकर यांनी ही माहिती दिली.

Advertisement

महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने केलेल्या सर्वेक्षणातून ही माहिती  समोर आली आहे.

शालेय शिक्षण विभागाने कोरोनामुक्त भागात १५ जुलैपासून आठवी ते बारावीच्या शाळा सुरू करण्यास परवानगी दिली आहे.

त्या पार्श्वभूमीवर हे सर्व्हेक्षण करण्यात आले. त्यामुळे पुणे जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये आता शाळा सुरू होण्याच्या मार्गावर आहेत.

Advertisement

नियमांचं पालन करणं आवश्यक

कोरोनासंबंधी सर्व आवश्यक ती खबरदारी घेण्यात यावी. शासनानं जारी केलेल्या कार्यपद्धतीचं काटेकोरपणानं पालन करावं.

एका बाकावर एक विद्यार्थी, दोन बाकांमध्ये 6 फूट अंतर, एका वर्गात जास्तीत जास्त 15 ते 20 विद्यार्थी, सतत साबणाने हात धुणे, मास्कचा वापर, कोणतेही लक्षण असल्यास विद्यार्थ्यांना घरी पाठविणे, लगेच कोरोना चाचणी करून घेणे या नियमांचं पालन करण्यात यावं, असं शासनानं शासन निर्णयात म्हटलं आहे.

Advertisement