Punelive24.com
Latest News, Videos, Web Stories and Photos from Pune

खा. कोल्हे यांच्यामुळे 82 कोटी मंजूर

खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी सुचविलेल्या शिरूर लोकसभा मतदारसंघातील राजगुरूनगर, शिरूर आणि हवेली तालुक्यातील ८१ कोटी ७५ लाख रुपये किंमतीच्या विविध रस्त्यांच्या कामांना पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने २०२१-२२ च्या आराखड्यांतर्गत मंजुरी दिली आहे.

विकासकामांचा ओघ कायम

कोविड १९ चे जागतिक महामारीच्या काळात केंद्र सरकारने २०२०-२१ व २०२१-२२ असा दोन वर्षांचा सुमारे १० कोटी रुपयांचा खासदार निधी अन्य कामांसाठी वळविला असला, तरी अन्य योजनांतून भरघोस निधी आणण्यात डॉ. कोल्हे यशस्वी झाले असून मतदारसंघातील विकासकामांचा ओघ त्यांनी कायम ठेवला आहे.

या कामांना निधी

‘पीएमआरडीए’च्या २०२१-२२ च्या आराखड्यांतर्गत शिरूर तालुक्यातील मौजे निमगाव भोगी ते सोनेसांगवी (इजिमा १४६) रस्त्याचे बांधकाम करणे ( १०१.०० लाख), मौजे गणेगाव येथील वरुडे, चिंचोशी, कान्हुरमेसाई (इजिमा १४२) रस्त्याचे बांधकाम करणे (१३५ लाख), हवेली तालुक्यातील नायगाव थेऊर शिवरस्ता करणे ( २८१.५० लाख), राजगुरूनगर तालुक्यातील मौजे सुतारवाडी अंतर्गत प्रजिमा १७ ते सुतारवाडी रस्ता सुधारणा करणे (७५ लाख), वाफगाव ते मांदळेवाडी (ग्रा.मा.७१) रस्ता करणे ( ७५ लाख), मौजे आखरवाडी अंतर्गत गावठाण ते ढमढेरे वस्ती रस्ता करणे ( ७५ लाख) आणि मौजे तोरणे येथील तोरणे पराळे जोडरस्ता (शिवरस्ता) करणे (७५ लाख) आदी रस्त्यांच्या कामांना मंजुरी मिळाली आहे.

Advertisement

‘पीएमआरडीए’च्या माध्यमातून साडेचौदा कोटींची विकासकामे

खासदार डॉ. कोल्हे यांनी ‘पीएमआरडीए’च्या माध्यमातून आतापर्यंत साडेचौदा कोटींची विकासकामे मंजूर करून आपल्या कामांचा धडाका कायम ठेवला असल्याचे स्पष्ट होत आहे.

डॉ. कोल्हे म्हणाले, की खासदार म्हणून निवडून आल्यानंतर अवघ्या ७-८ महिन्यांत कोविडचे संकट आले. केंद्र सरकारने दोन वर्षांचा खासदार निधी रद्द केला.

अशा परिस्थितीत विकासकामे करण्यासाठी लोकांच्या अपेक्षांचे खूप मोठे ओझे शिरावर होते; पण त्याही परिस्थितीत मार्ग काढून विकासाची प्रक्रिया अविरत सुरू ठेवण्यासाठी प्रयत्न करीत होतो.

Advertisement

यांचे मिळाले सहकार्य

या प्रयत्नांना राज्याचे उपमुख्यमंत्री व पालकमंत्री अजितदादा पवार यांनी खूप मोठे मोलाचे सहकार्य केले. त्यामुळेच शिरूर लोकसभा मतदारसंघात मोठ्या प्रमाणावर निधी आणता आला.

याखेरीज शिरूरचे आमदार अॅड. अशोक बापू पवार, राजगुरूनगरचे आमदार दिलीप मोहिते पाटील यांनीही चांगली साथ दिली. त्यामुळे एकमेकांच्या सहकार्याने मतदारसंघातील विकासकामे करण्यात आम्हाला यश येत आहे.

सर्वात महत्त्वाचे म्हणजे जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्यात यश येत आहे, हीच समाधानाची बाब आहे, असे कोल्हे यांनी सांगितले.

Advertisement

 

Leave a comment