पावसाळ्यात साचलेल्या पाण्यात डासांचा प्रादुर्भाव वाढतो पर्यायाने डेंगी, हिवताप, चिकनगुणिया आदी आजारांची साथ येते शहरात जुलै महिन्याच्या पहिल्या १८ दिवसातच डेंग्यूच्या तब्बल ८६ रुग्णांची नोंद झाली आहे.

रूग्णसंख्या वाढण्याची शक्यता

महापालिकेच्या कीटक प्रतिबंधक विभागात या आकडेवारीची नोंद झाली असून, क्षेत्रीय कार्यालयाद्वारे जनजागृती आणि प्रतिबंधात्मक उपाययोजनाही वाढविण्यात आल्या आहे.

पावसाळ्यात डासांचा प्रादुर्भाव वाढू नये, म्हणून नागरिकांनी आवश्यक ती काळजी घ्यावी, असे आवाहन सहाय्यक आरोग्य प्रमुख डॉ. संजीव वावरे यांनी केले आहे.

Advertisement

टाळेबंदीच्या काळात गेल्या वर्षीपासून तुलनेने कमी रुग्णांची नोंद होत आहे; मात्र पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर आशा आजारांकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. येत्या काळात ही रूग्णसंख्या वाढण्याची शक्यताही वर्तविण्यात आली आहे.

क्षेत्रिय कार्यालये सक्रिय

महापालिकेच्या आरोग्य विभागातर्फे क्षेत्रीय कार्यालयाद्वारे जनजागृती करण्यात येत आहे. पाणी साचेल अशा सर्व जागांची तपासणी करून पाण्याच्या निचऱ्याची व्यवस्था केली जात आहे. डेंग्यूचा रूग्ण आढळल्यास त्या भागात औषध फवारणी केली जात आहे, अशी माहिती डॉ. वावरे यांनी दिली.

 

Advertisement