file photo

मुंढवा परिसरातील पेट्रोलपंपावर जमा झालेली१३ लाखांची रोकड व्यवस्थापकाने लांबविल्याचा प्रकारनुकताच उघडकोस आला. संगणकीय करामती करून हा प्रकारघडल्याचे प्राथमिक चौकशीत निष्पन्न झाले आहे.

या प्रकरणीव्यवस्थापक श्रीहरी दामू बंडगर (वय ३०) याच्याविरुद्ध मुंढवापोलीस ठाण्यात बुधवारी (दि. २२) गुन्हा दाखल करण्यातआला. पंपाचे मालक श्रीनिवास जगताप (वय २६, रा. पद्मावती)यांनी फिर्याद नोंदवली आहे.

जगताप यांच्या मालकीचा मुंढवापरिसरात सिद्धार्थ पेट्रोल पंप आहे.आरोपी बंडगर तेथे गेल्याकाही वर्षांपासून व्यवस्थापक म्हणून काम करत होता. पंपावरीलउधारीची रक्‍कम जमा झालेलीहोती.याबाबतची नोंद संगणकावरकरण्यात आली होती.

Advertisement

बंडगर याने संगणकीय नोंदीत फेरफारकरून या रकमेचा अपहार केला. पोलीस उपनिरीक्षक प्रशांतमाने या प्रकरणी तपास करत आहेत.