ahmednagarlive24
Breaking News Updates Of Ahmednagar

पुण्यात फ्लॅट देण्याच्या आमिषाने बीडमध्ये ९९ जणांना गंडा

घर घेण्याचे प्रत्येकाचे स्वप्न असते. त्यासाठी एकदम पैसे उपलब्ध होत नाहीत. त्यामुळे थोडे थोडे करून पैसे भरण्याच्या आणि घर मिळवण्याच्या योजना आखल्या जातात.

त्या ब-याचदा खोट्याच असतात; परंतु अशा योजनांना भुलून अनेक जण गुंतवणूक करतात आणि नंतर फसतात. बीडमध्येही पुण्यात फ्लॅट देण्याच्या योजनेत अनेकांची फसगत झाली.

मेरिट लँडमार्क

प्रत्येक महिन्याला ठरावीक रक्कम जमा करत जा, पाच वर्षानंतर रक्कम दुप्पट करून देवू अथवा पुण्यात प्लॉट किंवा फ्लॅट देवू असे आमिष दाखवून मेरिट लँडमार्क या कंपनीने ९९ जणांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला.

बीड शहरातील जालना रोड भागात मेरिट लँडमार्क या कंपनीने २०१४ मध्ये कार्यालय थाटले होते. या कंपनीच्या माध्यमातून गुंतवणूकीवर चांगले व्याज देण्याचे अथवा पुण्यात प्लॉट किंवा फ्लॅट देण्यात येईल असे सांगण्यात येत होते. त्यावर विश्वास ठेवत बीड जिल्ह्यातील अनेकांनी गुंतवणूक केली.

पुण्यात जाऊन गुंतवणूक

बीडमधील २०१७ मध्ये हे कार्यालय बंद करण्यात आले. पुढे अनेकांनी पुणे येथे जावून नियमितपणे रक्कम जमा केली. कालावधी पूर्ण झाल्यानंतर गुंतवूणकदारांनी कंपनीकडे रक्कम अथवा प्लॉटची मागणी केल्यानंतर त्यांनी सध्या कोरोना टाळेबंदी असल्याचे कारण पुढे केले.

दरम्यानच्या काळात या कंपनीचे अध्यक्ष, संचालक यांचे मोबाईल स्वीच ऑफ झाल्याने गुंतवणूकदारांनी पुण्यात धाव घेतली असता तेथे कार्यालय बंद असल्याचे निदर्शनास आले.

आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर गुंतवणूकदार भाऊसाहेब बापुराव गळगटे (रा. हरिनारायण आष्टा, ता. आष्टी) यांनी बीड शहर पोलिस ठाणे गाठत मेरिट लँडमार्क, पुणे या कंपनीचे अध्यक्ष महेश प्रकाश मुंगसे, संचालक सुरेश भानुदास जाधव, किरण प्रकाश आटपालकर, महादेव विश्वनाथ साळुंके (रा. पुणे) यांच्या विरोधात ९९ जणांची ८९ लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी तक्रार दिली.

पुण्यातही गुन्हे दाखल

या कंपनीने बीडबरोबरच पुण्यातही अनेकांकडून पैसे जमा केलेले आहेत; परंतु ते वेळेवर परत न केल्याने पुणे शहरातही या कंपनी विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. संचालक बेपत्ता असल्याने गुंतवणूकदारांचा जीव मात्र टांगणीला लागला आहे.

 

You might also like
2 li