एका (१४ वर्षीय) अल्पवयीन मुलीसोबत ओळख करून घेत तिचे फोटो काढत इतरांना पाठवण्याची धमकी देऊन पाच मित्रांनी दोन वर्ष सामूहिक बलात्कार करण्यात आला.

तरुणीच्या वडीलांना जीवे मारण्याची धमकी देत पाच मित्रांनी नगर रोडवरील एक लॉजवर १५ जून २०१९ ते १५ जून २०२१ च्या दरम्यान वेगवेगळ्या गाड्यांमध्ये नेऊन तिच्यावर बलात्कार केल्याचं स्पष्ट झालं आहे.

चाैघांना अटक, एक फरार

फोटो व्हायरल करण्याची धमकी देत १४ वर्षीय अल्पवयीन मुलीवर पाच मित्रांनी दोन वर्षे सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना आळेफाटा (ता. जुन्नर) परिसरात घडली आहे. याबाबत पीडितीने आळेफाटा पोलिसात फिर्याद दिली.

Advertisement

या प्रकरणी चार जणांना पोलिसांनी अटक केली असून एक आरोपी फरार आहे. या घटनेमुळं परिसरात खळबळ उडाली असून लोकांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

हे आहेत आरोपी

या प्रकरणी पीडितीच्या तक्रारीवरून निखील पोटे, विकी पोटे, बंटी तितर, दया टेमगिरे, यश गाडेकर (सर्वांचे वय २८ वर्षापेक्षा अधिक, रा. आळेफाटा, ता. जुन्नर, जि. पुणे) यांच्या विरुद्ध बलात्कारासह बाललैंगिक अत्याचार विरोधी कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे

Advertisement