Punelive24.com
Latest News, Videos, Web Stories and Photos from Pune

पर्यटनस्थळी जमावबंदी आदेश लागू

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लोणावळ्यासारख्या पर्यटनस्थळी 144 कलम लागू करण्यात आले आहे. त्यामुळे पर्यटकांना तिथे गर्दी करता येणार नाही

येत्या आठवड्यातही पुणे आणि पिंपरी चिंडवड ध्ये निर्बंध कायम राहणार असल्याचं पुणे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केलं आहे.

पुन्हा एकदा पुणे जिल्ह्यात पूर्वीचेच निर्बंध कायम ठेवण्यात आले आहेत. येत्या आठवड्यातही पुण्यात तिसऱ्या टप्प्यातील निर्बंध लागू असणार आहेत.

Advertisement

शनिवार, रविवार विकेंडला अत्यावश्यक सुविधा वगळता कडक निर्बंध लागूच राहणार आहेत.

धबधब्यापासून वाहने एक किलोमीटर दूर

लोणावळ्यात पर्यटनस्थळी 144 कलम लागू करण्यात आला असून पाच किंवा त्या पेक्षा अधिक व्यक्तींना एकत्र येण्यास मज्जाव करण्यात आला आहे.

याव्यतिरिक्त धबधब्यापासून एक किलोमीटर परिसरात वाहनांना बंदी असेल. आजपासून नवीन नियम लागू करण्यात आलेत.

Advertisement

या पर्यटनस्थळांवर नियम लागू

भुशी डॅम, घुबड तलाव, लोणावळा डॅम, तुंगाली डॅम, राजमाची पॉइंट, मंकी पॉइंट, अमृतांजन ब्रिज, वलवण डॅम, एकविरा मंदिर परिसर, वेहेरगाव, टायगर पॉइंट, लायन पॉइंट, शिवलिंग पॉइंट, कार्ला लेणी, भाजे लेणी, लोहगड किल्ला, तुंग किल्ला, विसापूर किल्ला, तिकोणा किल्ला, पवना धरण परिसर, भाजे धबधबा

पालिकेचे आदेश

पुणे शहरात पाॅझिटिव्हीटी दर पाच टक्क्यांच्या खाली आहे; मात्र असं असूनही बंधनं शिथील करायला प्रशासन तयार नाही. पवारांच्या आढावा बैठकीआधीच पुणे पालिकेने निर्बंध कायम राहतील असे आदेश काढले.

या निर्बंधानुसार व्यापारी, हॉटेल व्यावसायिकांना आणखी प्रतीक्षा करावी लागणार आहे. पुण्याच्या ग्रामीण भागात काही तालुक्यात 8 वी ते 12 वी चे वर्ग सुरू झाले असले, तरी पुणे शहरात सर्व शैक्षणिक संस्था 31 जुलै पर्यंत बंदच राहतील असं आदेशात नमूद करण्यात आलं आहे.

Advertisement

 

Leave a comment