file photo

मागील वर्षी मार्च महिन्यापासून राज्यात काेराेनाची सुरुवात झाली आणि नंतरच्या काळात लाॅकडाऊनमुळे आर्थिक संकटाला सर्वांना सामाेरे जावे लागले.

राज्य शासनालाही विकासकामासाठीचा निधी आराेग्य विभागाच्या उपाययाेजनेकरिता वळवावा लागला.

मात्र, यादरम्यान पुणे जिल्ह्यात १५ सप्टेंबरपर्यंत पाेलिस आणि स्थानिक स्वराज्य संस्थेमार्फेत तब्बल ४४ काेटी ९६ लाख ८४ हजार रुपयांचा दंड काेराेना निर्बंधाचे उल्लंघन व मास्क कारवाईत गाेळा करण्यात आला आहे.

Advertisement

तर, केवळ मागील एक आठवडयात अडीच हजार लाेकांकडून दहा लाख ६० हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आलेला आहे.

पुणे शहराच्या हद्दीत पाेलिसांकडून आतापर्यंत एकूण पाच लाख ३६ हजार २५५ जणांवर कारवाई करून २६ काेटी ३५ लाख ७१ हजार रुपये जमा करण्यात आले.

Advertisement