file photo

स्वारगेट एसटी स्थानक परिसरात प्रवाशांना अडवून त्यांना लुटणाऱ्या चोरट्यांच्या टोळीला पोलिसांनी पकडले. त्यांच्याकडून तीक्ष्ण शस्त्र जप्त करण्यात आले.

युवराज नामदेव गायकवाड (वय ३१), प्रभू बाबूराव जाधव (वय ५४, दोघे रा. सेटलमेंट कॉलनी, सोलापूर), बजरंग बलभीम गायकवाड (वय ४५), संतोष छोटू जाधव (वय ३७, दोघे रा. सर्वोदय कॉलनी, मुंढवा) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.

त्यांच्याबरोबर असलेल्या एका साथीदाराविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हे शाखेतील पोलीस नाईक मोहसीन शेख यांनी या संदर्भात स्वारगेट पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

Advertisement

स्वारगेट स्थानक परिसरात रात्री येणाऱ्या प्रवाशांना धमकावून त्यांच्याकडील ऐवज लुटणारी चोरट्यांची टोळी शंकरशेठ रस्त्यावर थांबल्याची माहिती गुन्हे शाखेच्या युनिट दोनला मिळाली होती. त्यानंतर तेथे सापळा लावून चौघांना पकडण्यात आले.

त्यांच्याबरोबर असलेला एक साथीदार अंधाराचा फायदा घेऊन पसार झाला. चोरट्यांकडून कटर आणि मिरचीपूड जप्त करण्यात आली असून सहायक पोलीस निरीक्षक प्रकाश मोरे तपास करत आहेत.

Advertisement