Yes Bank ने सणासुदीच्या काळात Home Loan वर एक जबरदस्त ऑफर आणली आहे. होम लोनवर येस बॅंक २.२५ टक्क्यांची दणदणीत सूट देते आहे. ही ऑफर मर्यादित कालावधीसाठीच आहे.

या ऑफरच्या काळात होम लोन ६.७ टक्के दराने उपलब्ध असणार आहे. जर एखाद्या नोकरदार महिलेने होम लोन घेतले तर त्यासाठी व्याजदर ६.६५ टक्के इतकाच असणार आहे.

येस बॅंक सध्या किमान ८.९५ टक्के व्याजदर आणि कमाल ११.८० टक्के व्याजदराने गृहकर्ज देते आहे. प्रोसेसिंग फी ही कर्जाच्या रकमेच्या २ टक्के किंवा किमान १०,००० रुपये आहे.

Advertisement

येस बॅंकेची ही ऑफर ३१ डिसेंबर २०२१ पर्यत असणार आहे. व्याजदरातील कपातीद्वारे बॅंकेचे उद्दिष्ट या तिमाहीमध्ये गृहकर्जाचे प्रमाण दुप्पट करणे हे आहे. या ऑफर अंतर्गत ग्राहकांना ३५ वर्षांपर्यतच्या कालावधीसाठी होम लोन मिळणार आहे.

शिवाय प्रीपेमेंट चार्जदेखील माफ करण्यात आले आहे. जर तुमचे आधीचे गृहकर्ज सुरू असेल तर बॅलन्स ट्रान्सफर केल्यावरदेखील या ऑफरचा फायदा घेता येणार आहे.

येस बॅंकेने या ऑफरची माहिती देताना म्हटले आहे की ग्राहकांना घर विकत घेताना अधिक सुलभ यासाठी व्याजदर कमी करण्यात आले आहे. होम लोनसाठी कालावधी ३५ वर्षांपर्यत ठेवण्यात आला आहे.

Advertisement

यामुळे ग्राहकांवरील ईएमआयचा बोझा कमी होणार आहे. शिवाय दुसऱ्या बॅंकेत कर्ज असणारे ग्राहकदेखील बॅलन्स ट्रान्सफरच्या मदतीने या ऑफरची सुविधा घेऊ शकतात.

येस बॅंकेला पुढील तीन महिन्यात आपल्या गृहकर्जाचे प्रमाण दुप्पट करायचे आहे.मागील काही महिन्यांपासून रियल इस्टेटच्या बाजारपेठेत सुधारणा झाली आहे. घरांच्या विक्रीत तेजी दिसून येते आहे.

जाणकारांच्या मते या सणासुदीच्या काळात घरांच्या विक्रीत मोठी वाढ होईल. अशावेळी बॅंकेकडून देण्यात आलेल्या व्याजदरातील कपातीचा लाभ ग्राहक नक्कीच घेतील. बॅंकांचा गृहकर्जाचा व्यवसाय वाढण्याची शक्यता आहे.

Advertisement