कोरोनाची दुसरी लाट आता कुठे ओसरताना दिसून येत आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने सगळीकडे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. पुण्यामध्ये एका गर्भवती महिलेला तिच्या मुलासोबत वाचवण्यात आल्याची घटना घडली आहे.

सात महिन्यांच्या महिलेला गर्भवती असताना न्यूमोनिया झाल्याची एक घटना घडली होती. तिचे जवळपास ८० टक्के फुफ्फुस खराब झाल्याने तिला व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते.

तिला व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आल्यामुळे बाळाचे पण प्राण धोक्यात आले होते. डॉक्टरांनी उपचार करून गर्भवतीला आणि तिच्या बाळाला वाचवण्याचा प्रयत्न केला. या माय लेकाचे प्राण वाचवण्यात आल्यामुळे पूना हॉस्पिटलच्या डॉक्टरांना यश आले आहे.

Advertisement

या डॉक्टरांच्या टीममध्ये स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. सुनीता उंबरकर, फिजिशियन डॉ. अजित तांबोळकर, छातीरोगतज्ज्ञ डॉ. नितीन अभ्यंकर, संसर्गरोगतज्ज्ञ डॉ. संजय पुजारी, हृदयरोगतज्ज्ञ डॉ. हसमुख गुजर, डॉ. परिमल चौधरी आदी तज्ज्ञांनी उपचार केले.

डॉक्टरांनी गर्भवती महिलेवर आणि तिच्या बाळावर ऑपरेशन केले. हे ऑपरेशन केल्यामुळे महिलेला हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती.

महिलेवर ‘कार्डियोमायोपॅथी या प्रकारचे ऑपरेशन करण्यात आले. डॉक्टरांनी अथक प्रयत्न केल्यामुळे आईची प्रकृती सुधारत गेली. एक महिनभर दवाखान्यात ठेवल्यामुळे तिला नंतर हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आला.

Advertisement