पुणे – पुणे जिल्ह्यातील बारामती (Baramati) येथील इंदापूर रस्त्यावर एक अत्यंत दुर्दैवी घटना घडली आहे. भरधाव वेगाने आलेल्या डंपरने रस्त्याने (dumper crushed) जाणाऱ्या मेंढ्या (sheep) अक्षरक्ष चिरडत नेल्या असून, यामध्ये तब्बल 17 मेंढ्या (sheep) चिरडल्या गेल्या आहेत. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात आक्रोश व्यक्त केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना बारामतीतील इंदापूर रस्त्याला जोडणाऱ्या बाह्यवळण मार्गावर शुक्रवारी 5 ऑगस्ट रोजी ही घटना घडली.

जीवापाड जपलेल्या मेंढ्या (sheep) डोळ्यादेखत डंपरखाली चिरडल्या गेल्याने (dumper crushed) मेंढपाळ महिलेने मोठा आक्रोश व्यक्त केला आहे.

Advertisement

या अपघातानंतर रस्त्यावरील वाहतूक काही काळासाठी थांबविण्यात आली होती. शहर पोलिस ठाण्याचे निरीक्षक सुनील महाडीक यांनी घटनास्थळी भेट देत पाहणी केली.

डंपर क्रमांक (एमएच 11 सीएच 7511) हा माळावरच्या मार्गावरून इंदापूर रस्त्याकडे निघाला होता. यावेळी या डंपरने रस्त्यावरून जाणाऱ्या मेंढ्या चिरडल्या. काही अंतरावर जावून तो थांबला.

या घटनेत मेंढ्यांचा चेंदामेंदा झाला. संभाजी मोठे या मेंढपाळाच्या मेंढ्या असल्याचे पोलिसांनी सांगितले. अपघातानंतर मेंढपाळ महिलेने केलेला आक्रोश उपस्थितांची मने हेलावून गेला.

Advertisement

दरम्यान, भाजपचे अभिजित देवकाते यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. मेंढपाळांना नुकसान भरपाई दिल्याशिवाय डंपर नेऊ देणार नाही, अशी भूमिका त्यांनी घेतली.

पोलिसांनी एकेरी वाहतूक सुरु करत बंदोबस्त ठेवला. या प्रकरणी शहर पोलिस ठाण्यात अद्याप कोणतीही नोंद झालेली नाही.

Advertisement