पुणे जिल्ह्यात पवार विरुद्ध हर्षवर्धन पाटील यांच्यातला संघर्ष नवा नाही. पवार यांनी सातत्यानं हर्षवर्धन पाटील यांच्याविरोधात राजकारण केलं.

आता तर हर्षवर्धन पाटील यांच्या भावानं राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानं पाटील यांना मोठा धक्का बसला आहे.

कोण आहेत प्रशांत पाटील ?

हर्षवर्धन पाटील यांचे चुलत बंधू व माजी सभापती प्रशांत पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.

Advertisement

पुण्यातील या पक्षप्रवेश कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री अजित पवार, राज्यमंत्री दत्तात्रय भरणे, जिल्हा अध्यक्ष प्रदीप गारटकर यांची प्रमुख उपस्थिती होती.

पुणे येथील शासकीय विश्रामगृह या ठिकाणी हा पक्ष प्रवेश झाला. प्रशांत पाटील हे इंदापूर पंचायत समितीचे माजी सभापती आहेत.

भाजपचे कार्यकर्ते राष्ट्रवादी येणार

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेशानंतर प्रशांत पाटील म्हणाले, “राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे व राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे यांच्या मार्गदर्शनाखाली इंदापूर तालुक्यात जोरदार काम करणार आहे. भाजपचे असंख्य कार्यकर्ते राष्ट्रवादीत आणणार आहे.”

Advertisement

आगामी निवडणुकीत फायदा

आगामी काळात नगर पालिका, जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुका होणार आहेत. तसेच सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुका आहेत.

प्रशांत पाटील यांच्या माध्यमातून येणाऱ्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला फायदा होऊ शकतो.

सुबोध मोहिते यांचा प्रफुल पटेलांकडून सत्कार

नागपूर येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या नागपूर ग्रामीण विभागाच्या कार्यकारिणीची बैठक झाली. या वेळी राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केलेले माजी केंद्रीय मंत्री सुबोध मोहिते यांचा प्रफुल पटेल यांनी शाल व श्रीफळ देऊन सत्कार केला.

Advertisement

या वेळी पटेल म्हणाले, “नागपूर जिल्ह्यातील सर्व तालुकाध्यक्ष, विधानसभा अध्यक्ष व महिलाध्यक्षांनी पक्ष कार्याचा तालुका निहाय अहवाल सादर करून तालुक्यातील विविध समस्या मांडल्या.

येणाऱ्या काळात संपूर्ण जिल्ह्याचा दौरा करून शेतकरी, शेतमजूर व वंचित समाजाचे प्रश्न जाणून, त्यांचे निराकरण करण्याचे अभिवचन दिले.”

Advertisement