पुणे – करोनाच्या (corona) संकटामुळे आषाढीच्या पायी वारीला (Ashadhi Wari) खंड पडलेला होता. मात्र मोजक्या वारकऱ्यांमध्ये परंपरा कायम राखली गेली. पण आता करोना (corona) आवाक्यात आलाय, म्हणूनच पुन्हा एकदा भाविक आपल्या लाडक्या विठूरायाची भेट घेण्यासाठी पंढरपूरला (pandharpur) रवाना झाले आहेत. सध्या, आषाढी एकादशी (aashadhi Ekadashi 2022) निमित्त पंढरपुरात (Pandharpur wari 2022) वैष्णवांचा महासागर जमलेला आहे. 

दरम्यान, नांदेडच्या एका भक्ताने विठ्ठल रुक्मिणीला तब्बल अडीच किलो वजनाचे एक कोटी रुपयाचे सोन्याचे मुकुट भेट म्हणून दिलाय. सध्या सर्वत्र याची चर्चा रंगू लागली आहे.

उद्या होणाऱ्या आषाढी एकादशीच्या दिवशी नांदेड जिल्ह्यातील उमरी येथील भाविक विजयकुमार उत्तरवार श्री विठ्ठल आणि रुक्मिणीमातेला सोन्याचे मुकुट भेट देणार.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात कार्यक्रम पार पडेल. विजयकुमार उत्तरवार उमरी येथील सोन्या चांदीचे व्यापारी आहेत.

यंदा तुकोबारायांच्या पालखी सोहळ्यात एकूण 329 दिंड्या सहभागी झाल्या आहेत. वारी करून पालखी आज म्हणजेच, 9 जुलैला पंढरपूरमध्ये दाखल होणार आहेत.

दरम्यान, विठुरायाच्या दर्शनासाठी संपूर्ण देशातून लाखोंच्या संख्येने भाविक पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ होत असून, सध्या पंढरपुरात चैतन्याचे वातावरण पाहायला मिळत आहे.

तसेच, आषाढी यात्रेसाठी (Ashadhi Wari) येणाऱ्या भाविकांना विठुरायाचे दर्शन व्हावे म्हणून, मंदिर 24 तास खुले राहणार (Pandharpur wari 2022) आहे.

सावळय़ा विठुरायाचे आषाढी यात्रेनिमित्त 1 जुलै ते 18 जुलै पर्यंत या कालावधीत देवाचे दर्शन 24 तास राहणार आहे. श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीने हा निर्णय घेतला आहे.