मुंबई – बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यन (Kartik Aaryan)चा ‘आशिकी 3’ (Aashiqui 3) हा चित्रपट जाहीर झाल्यापासून सतत चर्चेत आहे. तितक्याच दुपट्टीने या चित्रपटातील मुख्य अभिनेत्रीच्या चर्चा होत आहेत. मात्र, अद्याप कोणाचेही नाव निश्चित झालेले नाही. आता बातम्या येत आहेत की ‘आशिकी 3’ (Aashiqui 3) चित्रपटात कार्तिक आर्यन (Kartik Aaryan) सोबत कोणत्या अभिनेत्रीला संधी मिळू शकते. अनुराग बासूच्या दिग्दर्शनाखाली बनणाऱ्या या चित्रपटाबाबत असे बोलले जात आहे की, या वर्षाच्या अखेरीस तो फ्लोरवर जाऊ शकतो.

‘आशिकी 3’साठी रश्मिका मंदान्ना पहिली पसंती

कार्तिक आर्यनच्या ‘आशिकी 3’ (Aashiqui 3) या चित्रपटाची लोकांमध्ये खूप क्रेझ आहे. या चित्रपटाची घोषणा झाल्यापासून चाहत्यांमध्ये याची उत्सुकता आहे. या चित्रपटासाठी मुख्य अभिनेता म्हणून कार्तिक आर्यनचे नाव फायनल झाले असले तरी,

अभिनेत्रीच्या नावाची चर्चा सुरू होती. मिळालेल्या माहिती नुसार, साऊथची लोकप्रिय अभिनेत्री रश्मिका मंदान्ना (Rashmika Mandanna) हिला निर्मात्यांनी फायनल केले आहे. मात्र, त्याची अधिकृत घोषणा अद्याप झालेली नाही.

असे सांगितले जात आहे की, निर्मात्यांना ‘आशिकी 3’ चित्रपटात नवीन जोडी हवी आहे, त्यामुळे त्यांना कार्तिक आर्यन आणि रश्मिका मंदाना (Rashmika Mandanna) यांना घ्यायचे आहे.

या चित्रपटाच्या घोषणेनंतर कार्तिक आर्यनसोबत दीपिका पदुकोण, क्रिती सेनॉन आणि श्रद्धा कपूर यांच्या नावांची सुद्धा चर्चा सुरू होती.

‘आशिकी’ फ्रँचायझीचे दिग्दर्शकही बदलले

विशेष म्हणजे ‘आशिकी’ 1990 साली रिलीज झाला होता. या चित्रपटात राहुल रॉय आणि अनु अग्रवाल होते. हा चित्रपट महेश भट्ट यांनी दिग्दर्शित केला होता.

आशिकी 2 2013 मध्ये रिलीज झाला होता. या चित्रपटात आदित्य रॉय कपूर आणि श्रद्धा कपूर होते. हा चित्रपट मोहित सुरीने दिग्दर्शित केला होता. हे दोन्ही चित्रपट लोकांना खूप आवडले होते. यासोबतच या चित्रपटांच्या गाण्यांनाही लोकांनी भरभरून प्रेम दिले.