मुंबई – एकामागून एक बॉलिवूड चित्रपट बॉक्स ऑफिसवर रिलीज होत आहेत. पण काही बॉलिवूड चित्रपट सोडले तर बहुतेक चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरले आहेत. या वर्षातील सर्वाधिक चर्चेत असलेल्या बॉलिवूड चित्रपटांबद्दल बोलायचे झाले तर कार्तिक आर्यन (Kartik Aaryan) च्या ‘भूल भुलैया 2’चे नाव आघाडीवर आहे. दरम्यान, कार्तिक आर्यन (Kartik Aaryan) आणखी एका चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर थैमान घालणार आहे.

कार्तिक आर्यन (Kartik Aaryan) ‘आशिकी 3’ (Aashiqui 3) मध्ये दिसणार आहे. या चित्रपटाची जोरदार चर्चा आहे. कार्तिक आर्यनसोबत या चित्रपटात कोणती अभिनेत्री दिसणार, असे प्रश्न सातत्याने उपस्थित केले जात आहेत.

कार्तिक आर्यनचा ‘आशिकी 3’ (Aashiqui 3) हा चित्रपट सध्या खूप चर्चेत आहे. या चित्रपटाची घोषणा झाल्यापासून कार्तिक आर्यनचे चाहते खूप खुश दिसत आहेत.

‘आशिकी 3’ (Aashiqui 3) मध्ये कार्तिक आर्यनसोबत कोणती अभिनेत्री रोमान्स करताना दिसणार आहे? असे अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. या आधी श्रद्धा कपूरचे (Shraddha Kapoor) नाव पुढे येत होते, जी ‘आशिकी 2’ मध्ये लीड रोलमध्ये दिसली होती.

या चित्रपटातही श्रध्दा कपूरला मुख्य अभिनेत्री म्हणून पाहण्याची चाहत्यांची इच्छा होती, पण तसे होऊ शकले नाही. यानंतर जेनिफर विंगेटचे (Jennifer Winget) नाव पुढे आले पण मीडिया रिपोर्ट्सनुसार या अभिनेत्रीच्या नावावर निर्माते एकमत होऊ शकले नाहीत.

दरम्यान, या चित्रपटाशी संबंधित एक नवीन अपडेट समोर आले आहे, त्यानुसार निर्माते यावेळी एका नवीन चेहऱ्याला संधी देणार आहेत. मात्र अद्याप नाव उघड करण्यात आलेले नाही.

‘आशिकी’ कधी रिलीज झाला?

‘आशिकी’ हा चित्रपट 1990 साली प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात राहुल रॉय आणि अनु अग्रवाल यांच्या महत्त्वाच्या भूमिका होत्या.

हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला होता. या चित्रपटाचे यश पाहून 2013 साली ‘आशिकी 2’ प्रदर्शित झाला. हा सुद्धा बॉक्स ऑफिसवर जबरदस्त हिट झाला होता.