ऑलिंपिक पदक मिळवण्याची क्षमता; पण डावलले

प्रादेशिकता कधी कधी यशाच्या आड येते. आंतरराष्ट्रीय रोईंगपट्टू दत्तू भोकनळ यांना हा अनुभव आला.

आपल्यात पात्रता असूनही शिबिरातून काढून टाकण्यात आल्याने केवळ महाराष्ट्रीयन असल्याने आॅलिंपिक पात्रता स्पर्धेत सहभागी होता येणार नाही, असा गंभीर आरोप त्यांनी केला आहे.

पात्रता स्पर्धेत सहभागी सहभाग नाकारला

ऑलिम्पिक पदक मिळवण्याची माझी क्षमता असूनही अचानक मला शिबिरातून काढण्यात आले. त्यामुळे मला ऑलिम्पिक स्पर्धेसाठीच्या पात्रता स्पर्धेत सहभागी होता आले नाही, असा आरोप दत्तू भोकनळ यांनी केला.

महाराष्ट्र सरकार आणि केंद्र सरकारनं या प्रकाराची दखल घेऊन मला न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.

अन्याय झाल्याची भावना

भोकनळ यांनी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर नौकानयनात महाराष्ट्राचा झेंडा फडकावला आहे. अचानक त्यांनी सैन्यदलाचा राजीनामा दिला आहे.

फेडरेशनवर अनेक गंभीर आरोप केले आहेत. महाराष्ट्रीयन असल्यामुळे माझ्याबाबत भेदभाव करण्यात आला. माझ्यावर अन्याय झाला, असा आरोप त्यांनी केला.

राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पदकांची कमाई

दत्तू भोकनळ हा 2016 सालच्या रिओ ऑलिम्पिक स्पर्धेत रोइंग प्रकारात पात्र ठरलेला एकमेव भारतीय खेळाडू होता. चांदवड तालुक्यातील तळेगाव रोही या छोट्याशा गावचे ते आहेत. त्यांनी नौकानयन या क्रीडाप्रकारात भारताचं नाव उज्वल केलं आहे.

दत्तू यांनी 2014 मध्ये राष्ट्रीय नौकानयन अजिंक्यपद स्पर्धेत दोन सुवर्णपदके पटकावली. 2015 मध्ये चीनमध्ये झालेल्या आशियाई नौकानयन अजिंक्यपद स्पर्धेत दत्तू यांनी सिंगल स्कल प्रकारात रौप्यपदकावर नाव कोरले.

त्यांनी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर रोइंगमध्ये भारतासाठी अनेक पदके जिंकवून दिले आहेत. 2017 मध्ये त्यांना महाराष्ट्र शासनाचा सर्वोत्कृष्ट शिवछत्रपती पुरस्कार देऊन गौरवण्यात आले होते. 2020 मध्ये दत्तू भोकनळ अर्जुन पुरस्काराचे मानकरी ठरले.

आशियाई स्पर्धेत चमकदार कामगिरी

महाराष्ट्राचा रोलिंगपटू दत्तू भोकनळ यांनी गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये झालेल्या आशियाई स्पर्धेत चमकदार कामगिरी केली.

अंगात 104 इतका ताप असतानाही दत्तू यांनी आशियाई गेम्समध्ये भारतीय टीमला सुवर्णपदक मिळवून दिलं होतं.