पुणे: दौंडमधील केडगावमध्ये सासरच्या मंडळींनी नवविवाहितेचा छळ करून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली आहे. यामध्ये विवाहितेचा गर्भपात झाला आहे. यावरून यवत पोलीस स्टेशनमध्ये सासरच्या मंडळींवर गर्भपात करणे, फसवणूक, मारहाण ,शिवीगाळ आदी कलमाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या घटनेमध्ये सासरच्या निलेश मोहन सलगर, सासरे तुकाराम मोहन सलगर, सासु सुनंदा मोहन सलगर, नणंद अश्विनी तानाजी मरगळे (पिंपरी चिंचवड) त्यांच्यावरही गुन्हा दाखल झाला आहे.व पती आणि सासरे यांना पोलीसांनी ताब्यात घेतले आहे.

पीडित विवाहितेची 14 नोव्हेंबर2019 रोजी लग्न झाले असून, सदर महिलेच्या लग्नामध्ये घातलेले दहा तोळे सोने सासरच्या मंडळींनी ताब्यात घेतले आहेत. तसेच लग्नाच्या वेळी पतीने सरकारी नोकरीमध्ये नसतानाही सरकारी नोकरीमध्ये असल्याचे सांगुन नवविवाहितेच्या माहेरच यांची फसवणूक केली.

Advertisement

सदर महिलेला मारहाण केल्यानंतर तिच्या पोटात दुखू लागले. त्यानंतर सोनोग्राफी केली असता सदर गर्भाचे हृदयाचे ठोके बंद झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. त्यानंतर काही दिवसांनी महिलेचा गर्भपात झाला. त्यानंतर पतीने सदर महिलेला बोरिपारधी येथे माहेरी आणुन सोडल्यानंतर महिलेने हा सर्व प्रकार उघड केला आहे.