file photo

पुणे: भारतीय हवामान विभाग आणि इतर विविध खासगी संस्थांच्या अंदाजाप्रमाणे देशात सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाला असला, तरी काही भाग मात्र अजूनही पावसाच्या प्रतीक्षेत आहे.

१९ विभागात दीडपट पाऊस

सौराष्ट्र, कच्छ, ईशान्यकडील राज्ये, जम्मू काश्मीर आणि आंध्र प्रदेशातील किनारपट्टी या भागात आतापर्यंत पावसाचे प्रमाण कमी राहिले आहे.

२० जूनपर्यंत देशात सरासरीपेक्षा ४१ टक्के अधिक पाऊस झाला आहे. मध्य भारतात सर्वाधिक पाऊस झाला आहे. देशभरातील ३६ हवामान विभागापैकी ८ विभागात सरासरीपेक्षा – २० ते ६० टक्के कमी पाऊस झाला आहे.

Advertisement

तर १९ विभागात सरासरीच्या तुलनेत १६० टक्क्यांहून अधिक पाऊस झाला आहे. ५ विभागात सरासरीपेक्षा १२० टक्के पाऊस झाला आहे. ४ विभागात सर्वसाधारण पाऊस झाला आहे.

केरळपासून काश्मीरपर्यंत कमी पाऊस

मॉन्सूनचे यंदा आगमन हे पश्चिमेकडून लक्षद्वीपकडून झाले, तरीही त्यानंतर लक्षद्वीप समूहावर मॉन्सूनच्या पावसाचा जोर राहिला नाही.

त्यामुळे लक्षद्वीपला सरासरीपेक्षा ४७ टक्के कमी पाऊस झाला आहे. मॉन्सूनचे केरळमध्ये नेहमीपेक्षा ३ दिवस उशीरा आगमन झाले.

Advertisement

आगमनानंतर पावसात खंड पडल्याने केरळमध्ये आतापर्यंत सरासरीपेक्षा १५ टक्के कमी पाऊस झाला आहे. त्याचप्रमाणे सौराष्ट्र, कच्छ परिसरात शनिवारी मॉन्सूनचे नेहमीपेक्षा अगोदर आगमन झाले आहे.

या भागातही ३३ टक्के कमी पाऊस झाला आहे. जम्मू काश्मीर – २६ टक्के, अरुणाचल प्रदेश – २३, आसाम, मेघालय – २१ टक्के कमी पाऊस झाला आहे.

उत्तर प्रदेशात सर्वाधिक पाऊस

देशभरात सर्वाधिक पाऊस पूर्व उत्तर प्रदेशात सरासरीपेक्षा तब्बल २२५ टक्के अधिक झाला आहे. पूर्व मध्य प्रदेश १६० टक्के, बिहार १४९ टक्के, उत्तराखंड १२८ टक्के पाऊस झाला आहे. पश्चिम राजस्थानात अजून मॉन्सून पोहचला नाही. तरीही तेथे सरासरीपेक्षा ११० टक्के पाऊस झाला आहे.

Advertisement

चार जिल्ह्यांत कमी पाऊस

धुळे -२९ टक्के, नंदुरबार -४६ टक्के, सोलापूर – ५ टक्के, अकोला – ४० टक्के पाऊस कमी झाला आहे. कोकणातील सर्व जिल्ह्यात सरासरीपेक्षा खूप अधिक पाऊस झाला आहे.

मुंबई उपनगर भागात सरासरीपेक्षा २१३ टक्के, कोल्हापूर २०० टक्के, सांगली १८०, सातारा १७६ टक्के, पुणे १२७ टक्के अधिक पाऊस झाला आहे. विदर्भातील चंद्रपूर १२४ टक्के, यवतमाळ ११३ टक्के आणि परभणी १३९ टक्के अधिक पाऊस झाला आहे.

Advertisement