Punelive24.com
Latest News, Videos, Web Stories and Photos from Pune

संख्याबळ कमी करण्यासाठी शिवीगाळीची स्टोरी!

बेशिस्त वर्तनाच्या कारणावरून भाजपच्या 12 आमदारांना निलंबित करण्यात आलं असलं, तरी शिवीगाळीचा आणि धक्काबुक्कीचा आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी फेटाळून लावला. विरोधी पक्षाचं संख्याबळ कमी करण्यासाठी रचलेला हा डाव आहे, असा आरोप त्यांनी केला.

आमदारांना निलंबित करण्याची शंका होतीच

फडणवीस माध्यमांशी बोलत असताना सररकारवर कटाचा आरोप केला. विरोधी पक्षाचं संख्याबळ कमी व्हावं म्हणून आमच्या आमदारांना निलंबित करण्यात आलं आहे.

आमचे आमदार निलंबित करण्यासाठीच सरकारच्या मंत्र्यांनी शिवीगाळ आणि धक्काबुक्कीची स्टोरी रचली, असा आरोप त्यांनी केला.

ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर आम्ही सरकारला उघडं पाडलं. सरकारमुळे आरक्षण कसं गेलं हे आम्ही दाखवून दिलं.

त्यामुळे आमच्या आमदारांवर खोटे आरोप लावून त्यांना निलंबित करण्यात आलं आहे. आमच्या आमदारांना निलंबित केलं जाईल, ही माझी शंका होती. ती खरी झाली, असे ते म्हणाले.

शिवसेनेच्या आमदारांकडून धक्काबुक्की

ओबीसींसाठी 12च आमदार काय, 106 आमदारांना निलंबित केलं तरी आम्ही लढा देत राहू, असा इशारा फडणवीस यांनी दिला.

राज्य सरकारने उद्या माझ्यावर हक्कभंग आणला तरी चालेल; पण सांगतो. एक स्टोरी तयार करण्यात आली होती. त्यानुसार आमच्या आमदारांना निलंबित करण्यात आलं. आमच्या एकाही आमदाराने शिवीगाळ केली नाही.

शिवी देणारे कोण होते हे सर्वांना माहीत आहे. शिवसेनेच्या सदस्यांनीच धक्काबुक्की दिली. त्यावर भाजपचे आमदार आक्रमक झाले, असा आरोप त्यांनी केला.

आमच्या आमदारांना आम्ही रोखले

आमच्या आक्रमक आमदारांना आम्ही दूर करण्याचा प्रयत्न केला. उलट आशिष शेलार यांनी या सर्व आमदारांच्या वतीने अध्यक्षांची माफी मागितली. त्यांची गळाभेटही घेतली.

तो विषय संपल्यावर आम्ही बाहेर आलो होतो; पण आमच्या आमदारांना सस्पेंड करण्यासाठी सरकारच्या मंत्र्यांनी स्टोरी रचली, असं ते म्हणाले.

 

 

Leave a comment