पुणे – राज्यातील अपघात सत्र (Maharashtra Accident Latest News) कमी होताना दिसत नाहीये उलट गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणावर राज्यात अपघात होताना दिसून येत आहेत. दरम्यान, या अपघातांत जीव (Accident Latest News) गमावलेल्या वाहनचालकांपैकी सरासरी तरुण वयोगटातील व्यक्तींची संख्या अधिक असल्याचं दिसून आलं आहे. त्यामुळे या भयानक अपघातांमुळे (Accident Latest News) एकच खळबळ उडाली आहे.  यामध्ये २५ ते ४५ या वयोगटातील व्यक्तींची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. 

नुकतंच महामार्ग पोलिसांनी जाहीर केलेल्या आकडेवारीतून स्पष्ट झाले आहे. कमावत्या वयातील म्हणजेच २४ आणि २५ या वयोगटातील तरुण चालकांच्या मृत्यूचे हे प्रमाण ५७ टक्के आहे.

गेल्या वर्षी रस्ते अपघातांत ६,७२९ चालकांचा (स्त्री आणि पुरुष) मृत्यू झाला. त्यापैकी ३,८५२ हे २५ ते ४५ वयोगटातील, तर २,०१४ चालक २५ ते ३५ वयोगटातील होते.

याशिवाय, मृत्यू झालेल्या चालकांमध्ये १८ ते २५ वयोगटातील व्यक्तींचे प्रमाण अधिक आहे. अपघातांत प्राण गमावणाऱ्या १८ ते २५ वयोगटातील चालकांची संख्या १,४२७ एवढी आहे.

तसेच अपघातात १०,१७९ चालक जखमी झाले. त्यापैकी २५ ते ४५ वयोगटातील संख्या ५,८९९ एवढी आहे. त्यामुळे कमावत्या व्यक्तीचा अपघातात मृत्यू झाल्याने अनेक कुटुंबांवर आर्थिक आघात सुद्धा झाल्याचं दिसून येत आहे.

घरातील कर्त्यां व्यक्तींचा मृत्यू….

अपघातांतील मृतांच्या आकडय़ांवर कटाक्ष टाकला तर तरुण चालकांचे प्रमाण मोठे आहे. अपघातात प्राण गमावलेला हा चालक वर्ग २५ ते ४५ वयोगटातील आहे, असे महामार्ग वाहतूक पोलिसांनी जाहीर केलेल्या आकडेवारीतून अधोरेखित होते.

दरम्यान, अपघातातील (Accident Latest News) मृतांचा आकडा गेल्यावर्षीच्या तुलनेत कमी झाला असला तरी तो पूर्णपणे शून्यावर आला नसून, प्रशासन देखील याकडे गांभीर्याने लक्ष देत आहे. काही दिवसांपूर्वी अपघातांची देखील आकडे वारी जारी करण्यात आली होती.