पुणे – राज्यातील अपघात सत्र (Maharashtra Accident Latest News) कमी होताना दिसत नाहीये उलट गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणावर राज्यात अपघात (Accident) होताना दिसून येत आहेत. अश्यातच पुन्हा एक अपघात झाल्याची बातमी समोर आली आहे. दूध वाहतूक करणाऱ्या टँकरच्या धडकेने दुचाकीवरील सहप्रवासी महिलेचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. रविवारी मांजरी भागात हा अपघात (Accident) घडला असून, या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.

अन्नपूर्णा उर्फ सुमन विजय पाटील (४२, रा. महादेवनगर, मांजरी) असे मृत्युमुखी पडलेल्या महिलेचे नाव आहे. दुचाकीस्वार विजय पाटील व त्यांची पत्नी सुमन रविवारी दुपारी मांजरी-महादेवनगर रस्त्याने जात होते.

त्या वेळी भरधाव वेगाने पाठीमागून टँकर येत होता. अरुंद रस्त्यावर वळणावर दुचाकीस्वार विजय यांचे नियंत्रण सुटले. दुचाकीस्वार विजय तोल जाऊन पडले. त्यावेळी पाठीमागून येणाऱ्या टँकरच्या धडकेने सहप्रवासी अन्नपूर्णा गंभीर जखमी (Accident) झाल्या.

त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारांपूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. अपघातानंतर (Accident) मांजरी-महादेवनगर रस्त्यावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली.

अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन टँकरचालकाला ताब्यात घेतले. त्याच्या विरोधात हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

रस्ते अपघातांत तरुण चालकांच्या मृत्यूचे प्रमाण सर्वाधिक..!

सध्या राज्यातील अपघात (Accident) सत्र मोठ्या प्रमाणावर वाढले असून, यामध्ये २५ ते ४५ या वयोगटातील व्यक्तींची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. नुकतंच महामार्ग पोलिसांनी जाहीर केलेल्या आकडेवारीतून स्पष्ट झाले आहे.

कमावत्या वयातील म्हणजेच २४ आणि २५ या वयोगटातील तरुण चालकांच्या मृत्यूचे हे प्रमाण ५७ टक्के आहे. गेल्या वर्षी रस्ते अपघातांत ६,७२९ चालकांचा (स्त्री आणि पुरुष) मृत्यू झाला. त्यापैकी ३,८५२ हे २५ ते ४५ वयोगटातील, तर २,०१४ चालक २५ ते ३५ वयोगटातील होते.