बारामती – बारामती (baramati) तालुक्यातील सांगवी येथे दुचाकी (two-wheeler) आणि छोटा हत्ती टेम्पो यांच्यात धडक होऊन भीषण अपघात (Accident) झाला असून, एकाचा जागीच मृत्यू झाला आहे. या भीषण अपघातामुळे (Accident) वाहतुकीचा खोळंबा होऊन महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. त्यामुळे वाहतुकीची प्रचंड कोंडी झाल्याने प्रवाशांची तारांबळ उडाली.

बारामती तालुक्यातील सांगवी- शिरश्णे मार्गावर दुचाकीवरून घरी निघालेल्या तरुणाचा छोटा हत्ती टेम्पोला समोरून जोरात धडक बसली. या अपघातात (Accident) डोक्याला जबर मार लागल्याने दुचाकीस्वराचा जागीच मृत्यू झाला.

हा अपघात काल (शनिवार) दुपारी 4 वाजण्याच्या दरम्यान सांगवी हद्दीत महादेव पुलाजवळ घडला आहे. याबाबत शासकीय रुई ग्रामीण रुग्णालया मार्फत तालुका पोलीस (police) ठाण्यात मयत दाखल केले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गणेश विठ्ठल बनकर (वय 33 ) रा. माळेवाडी लाटे, ता. बारामती, जि. पुणे ) असे अपघातात मरण पावलेल्या तरुणाचे नाव आहे. दुचाकी क्रमांक (एम एच 42एबी 9414) वरून मृत गणेश जात होता.

समोरून दोन गाई घेऊन येणारा छोटा हत्ती टेम्पो क्रमांक (एमएच 42 एक्यू 4082) शिरश्णे वरून सांगवीच्या दिशेने येत होता. यात दुचाकीस्वार व टेम्पोची समोरासमोर जोरदार धडक बसली.

यात दुचाकीस्वाराला डोक्याला जबर मार लागून तो जागीच मरण पावला. दुचाकीस्वार अस्थाव्यस्थ आवस्थेत पडला होता.

अपघातात (Accident) त्याच्या शरीराचे विविध अवयव रस्त्यावर पडल्याने हा हृदयद्रावक प्रकार बघून नागरिकांनी हळहळ व्यक्त केली.

त्यानंतर ग्रामस्थांनी गणेश बनकर यास शासकीय रुई ग्रामीण रुग्णालयात दाखल केले होते. उपचारा दरम्यान डॉक्टरांनी मृत असल्याचे घोषित केले.

दरम्यान, या अपघाताचा (Accident) तपास माळेगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किरण अवचर करत आहेत. यापूर्वी देखील बारामती परिसरात अनेक अपघात झाले असून,

प्रशासनाकडून वेळोवेळी वाहनचालकांना सतर्क राहण्याचे आणि नियमांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.