ahmednagarlive24
Breaking News Updates Of Ahmednagar

माजी सरपंचासह दोघांचा अपघाती मृत्यू

पुणे-नगर रस्ता मृत्यूचा सापळा ठरतो आहे. वाहनांची गर्दी, खराब रस्ता अपघाताला निमंत्रण देत आहे.

रविवारी सकाळी रस्त्यावर खासगी कंपनीच्या बस चालकाचा ताबा सुटून झालेल्या अपघातात माजी सरपंचासह दोघांचा मृत्यू झाला.

कामगारांच्या बस चालकाचा सुटला ताबा

बस चालक अशोक सुदाम मते हा रांजणगाव एमआयडीसीतील जाबिल कंपनीच्या कामगाराची वाहतूक करणारी बस (क्रमांक एम एच १२, के. क्यू. ३३१९) पुणे- नगर रस्त्याने घेऊन जात असताना कोंढापुरी चौकात बसवरील ताबा सुटल्याने चौकातील खंडोबा मंदिरात दर्शनासाठी आलेल्या दोघांना धडक बसली.

त्यामध्ये जखमी झालेल्या दोघांचा मृत्यू झाला असून, दोघेजण जखमी झाले आहेत. तसेच पार्किंग केलेली सहा दुचाकी वाहने व चार दुकानाच्या टपऱ्यांचे नुकसान झाले आहे. मंदिराचेही नुकसान झाले आहे.

दोघे जखमी

बसची धडक बसल्याने माजी सरपंच शामराव दगडू लोखंडे व रामचंद्र बुवाजी वाघमोडे हे दोघे मृत्युमुखी पडले आहेत, तर काशीराम शिवराम अडसूळ व मंगलसिंग अमरसिंग पवार (सर्वजण रा. कोंढापुरी) हे दोघेजण अपघातात जखमी झाले असून त्यांच्यावर दवाखान्यात उपचार चालू आहेत.

बस चालक अशोक मते हाही जखमी झाला आहे. खंडोबा मंदिरात नित्य दर्शनासाठी येणाऱ्या दोन नागरिकांचा बस अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला.

You might also like
2 li