वास्तुशास्त्रात अशा काही गोष्टी आहेत ज्या आपण कोणालाही सांगू नयेत. अन्यथा आपल्याला बर्‍याच समस्या उद्भवू शकतात.

या आहेत त्या पाच गोष्टी

कोणालाही स्वतःच्या पगाराबद्दल किंवा पैशाविषयी माहिती देऊ नये. लोकांना पैश्याशी संबंधित माहिती दिल्यास ते आपल्याशी ओळख वाढवून आपला गैरफायदा घेण्याची शक्यता असते ज्यामुळे आपले मोठे आर्थिक नुकसान होऊ शकते. त्यामुळे अनोळखी व्यक्तींना आपल्या आर्थिक परिस्थितीची माहिती देणे चुकीचे ठरते.

आपला अपमान झाला असल्यास त्याविषयी कोणालाही सांगू नका. असे म्हणतात की अशावेळी, समोरची व्यक्ती आपला आदर न करण्याची शक्यता असते. आणि जेव्हा वेळ येईल तेव्हा तो तुमचा अपमान देखील करू शकतो.

Advertisement

जर आपण दान केले तर त्याचे गुणगान आपण इतरांसमोर गाता कामा नये. असे केल्याने दानाचे महत्व कमी होते आणि त्याचे फळ देखील मिळत नाही.

कुणीही गृह दोषांचे वर्णन करू नये. असे केल्याने गृह शांती उपायांचा फायदा आपल्याला मिळणार नाही.

आपण आपले वय नेहमी गुप्त ठेवले पाहिजे. एकदा आपले वय इतरांना माहीत झाले तर त्याचा वापर ते आपल्या विरोधात कुठेही केव्हाही आणि कधीही करू शकतात.

Advertisement