file photo

औरंगाबाद : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मामांच्या कारखान्यावर ईडीने कारवाई केल्यानंतर आता माजी मंत्री पंकजा मुंडे यांच्या वैद्यनाथ कारखान्याची खाती सील करण्यात आली; परंतु पंकजा तसेच कारखान्याच्या कार्यकारी संचालकांनी हे वृत्त फेटाळले आहे.

पंकजा अध्यक्ष झाल्यापासून कारखाना अडचणीत

अगदी दोन दिवसांपूर्वी नाराजी नाट्यामुळे चर्चेत आलेल्या पंकजा मुंडे पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत. या वेळी चर्चेला कारण पंकजा मुंडे अध्यक्ष असलेल्या वैद्यनाथ सहकारी कारखान्याचे बँक खातं ईपीएफओ विभागाने सील केलं आहे;

मात्र पंकजा यांनी कारखान्यांचं कोणतंही खातं सील झालं नसल्याचं म्हटलं. हा साखर कारखाना अनेक दिवस चांगला चालू होता. कारखान्याने दैदिप्यमान कारकीर्द पाहिली आहे; मात्र पंकजा अध्यक्ष झाल्यापासून हा कारखाना गटांगळ्या खातो आहे.

Advertisement

विधानसभा निवडणुकीच्या काळात कामगारांचं उपोषण

सुरुवातीला सुरुवातीला हा कारखाना कामगारांचे पगार दिली जात नसल्यामुळे चर्चेत होता. विधानसभेच्या निवडणुकीच्या काळात एकीकडं पंकजा मतदारांना सामोरे जात असताना कारखान्यातील कामगार आपला पगार मिळावा,

म्हणून वैद्यनाथ कारखान्यासमोर उपोषण करत होते. पंकजा यांनी त्यांच्या उपोषणाकडे दुर्लक्ष केलं. त्याचा फटका विधानसभेच्या निवडणुकीत बसला.

भविष्य निर्वाह निधी भत्ता भरला नाही

कारखान्याच्या या कामगारांचा भविष्य निर्वाह निधीचा भत्ता भरला नाही. त्यामुळे भविष्य निर्वाह निधी विभागाने पंकजा यांच्या कारखान्यांना अनेक नोटिसा बजावल्या; मात्र कारखान्याने या नोटिसांना केराची टोपली दाखवली.

Advertisement

त्यामुळे भविष्य निर्वाह निधी विभागाने वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याचं बँक खातं सील केलं. ईपीएफओ विभागाने बँक खात्यात असलेले तब्बल 92 लाख रुपये बाहेर काढत कामगारांच्या नावावर भरले. पंकजा यांना हा धक्का राजकीय नसला, तरी राजकारणावर नक्की परिणाम करणारा आहे.