Punelive24.com
Latest News, Videos, Web Stories and Photos from Pune

खडकवासला साखळी प्रकल्पामध्ये ‘इतका’ पाणीसाठा जमा

जिल्ह्यातील पानशेत, खडकवासला, कळमोडी, चासकमान आणि आंद्रा ही पाच धरणे पूर्ण भरली आहेत. खडकवासला प्रकल्पातील चार धरणांमध्ये २७.५९ टीएमसी पाणीसाठा झाल्यामुळे शहराच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटला आहे.

खडकवासला साखळी प्रकल्पात ९६ टक्के पाणीसाठा जमा झाला आहे. गेल्या वर्षी ऑगस्टच्या पहिल्या आठवड्याच्या तुलनेत यंदा दुपटीहून अधिक पाणीसाठा आहे.

जिल्ह्यात धरणांच्या पाणलोट क्षेत्रात समाधानकारक पाऊस झाल्यामुळे गुरुवार अखेर पानशेतसह पाच धरणे पूर्ण भरली आहेत.

Advertisement

खडकवासला धरणातून उजवा मुठा कालव्याद्वारे एक हजार १५५ क्युसेकने पाणी सोडण्यात येत आहे. तर, इतर सहा धरणांमध्ये ९२ टक्क्यांपेक्षा अधिक पाणीसाठा झाला असून, तीही भरण्याच्या मार्गावर आहेत.

खडकवासला प्रकल्पातील चार धरणांच्या पाणलोट क्षेत्रात काल दिवसभरात तुरळक पाऊस झाला. टेमघर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात ५ मिलिमीटर, वरसगाव ४ मिमी, पानशेत ३ मिमी आणि खडकवासला धरणाच्या पाणलोट क्षेत्रात एक मिलिमीटर पावसाची नोंद झाली, अशी माहिती जलसंपदा विभागाकडून देण्यात आली.

Advertisement
Leave a comment