फसवणूक, खून, खंडणी प्रकरणातील आरोपी वर्षानुवर्षे फरार राहतात. अचानक कधीतरी पोलिसांना सुगावा लागतो आणि ते त्यांच्या मुसक्या आवळतात. अशाच एका आरोपीला पाच वर्षानंतर जेरबंद करण्यात पोलिसांना यश आले आहे.

हा आहे आरोपी

फसवणुकीच्या गुन्ह्यात मागील पाच वर्षांपासून मुन्ना नियाज शेख (वय 43, रा. वानवडी बाजार, मूळ-उत्तरप्रदेश) हा फरार होता. खंडणी विरोधी पथक क्रमांक दोननं त्याला अटक केली आहे.

सापळा रचून अटक

खंडणी विरोधी पथकाचे पोलीस उपनिरीक्षक विजय झंजाड पथकासोबत हद्दीत गस्त घालीत असताना फसवणुकीच्या गुन्ह्यात मागील पाच वर्षांपासून फरार असलेला आरोपी वानवडी परिसरात असल्याची माहिती हवालदार प्रदीप शितोळे यांना मिळाली. त्यानुसार पथकाने सापळा रचून मुन्ना शेख याला ताब्यात घेतले. त्याला विश्रांतवाडी पोलिस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे.

Advertisement