Punelive24.com
Latest News, Videos, Web Stories and Photos from Pune

खुनाच्या गुन्ह्यातील आरोपीला दोन वर्षांनी अटक

सातव खून प्रकरणातील आरोपी सूरज सुतार याला दोन वर्षांनी अटक करण्यात पुणे ग्रामीण पोलिसांच्या दहशतवाद विरोधी पथकाला यश आले आहे. अन्य आरोपींना यापूर्वीच अटक करण्यात आली आहे.

दोन वर्षे पोलिसांच्या हातावर तुरी

सूरज सुतार याला ग्रामीण दहशतवाद विरोधी पथकाने औरंगाबाद येथून अटक केली आहे. २०१९ मध्ये दसऱ्याच्या दिवशी मुळशीतील लवळे येथे प्रतीक सातव याची पाच ते सहा जणांनी धारदार शस्त्राने वार करून निर्घृण हत्या केली.

त्यानंतर बाकी आरोपीना अटक करण्यात आली होती; मात्र गुन्हा घडल्यापासून यातील सूरज राजाराम सुतार (वय ३० वर्षे रा. सुतारवाडी, पाषाण) हा फरार होता.

पूर्वीचाही खुनाचा गुन्हा

पोलिस अधीक्षक पुणे ग्रामीण डॉ. अभिनव देशमुख यांनी त्याचा शोध घेण्याच्या उद्देशाने दहशतवाद विरोधी कक्षाला आदेश दिले होते.

त्यानुसार पोलिस पथकाने माहिती काढून सुतार याला सिल्लोड (जि. औरंगाबाद) येथे जाऊन ताब्यात घेतले आहे.

त्याला पौड पोलिस ठाण्याच्या ताब्यात दिले आहे. सूरज सुतार हा सराईत आरोपी असून त्याच्यावर यापूर्वी खुनाचा गुन्हा दाखल आहे.

कोयता, तलवारीने वार

मुळशीतील लवळे येथे राऊतवाडी ते भरे गावच्या दरम्यान सातव, कळमकरवस्ती आहे. या रस्त्याने प्रतिक व त्याचे अन्य दोन मित्र नवीन गाडी घेऊन सातवमळा (सावतामाळी मंदीर) परिसरात राहत्या घरी जात होते.

येथील एका पोल्ट्री फार्मलगतच्या रस्त्यावर मारेकरी आरोपींनी गाडीला ट्रॅक्टर आडवा घालून प्रतिकला बाहेर ओढले आणि त्याच्यावर कोयता तसेच तलवारींनी सपासप वार केले.

त्यात प्रतिकचा जागीच मृत्यू झाला होता. १९ ऑक्टोबर २०१९ ला ही घटना घडली होती. त्यानंतर आरोपीना तातडीने अटक करण्यात आली.

Leave a comment