कोरोनाचा प्रादुर्भाव होत असताना नियमाचे उल्लंघन करणाऱ्या चार दुकानदारांवर कायदेशीर कारवाई करण्यात आली असून ती दुकाने सात दिवस बंद ठेवण्यात येणार आहेत,

अशी माहिती प्रशासक तथा तहसीलदार विजय पाटील यांनी दिली. नगरपंचायत माळेगाव हे कोरोना हॉटस्पॉट म्हणून जाहीर केले होते.

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊन जाहीर केले होते. यावेळी काही नियम शिथिल करून आस्थापने चालू ठेवण्यात आली होती.

Advertisement

असे असताना काही दुकानदारांनी नियमाचे उल्लंघन केले. अशा दुकानदारांवर सात दिवस दुकान बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले.

यामध्ये कोथमिरे मटन व चिकन सेंटर (मालक- राजेंद्र बाळकृष्ण कोथमिरे), आरुष कॉर्नर ॲन्ड मिनी मार्केट (मालक- गौरव राजेंद्र शहा), सार्थक ड्रायफुट (मालक- जितेंद्र महावीर शहा), सार्थक डेअरी (मालक- सूर्यकांत माणिकचंद शहा) या दुकानदारांचा समावेश आहे.

दरम्यान, नगरपंचायत माळेगाव व परिसरात शासनाकडून दिलेल्या आदेशाचे पालन सर्वांनी करावे. नियमांचे उल्लंघन केल्यास संबंधितांवर दंडात्मक कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे प्रशासक तथा तहसीलदार विजय पाटील यांनी सांगितले.

Advertisement