पुणेः आंबील ओढयावरील अतिक्रमणाचा मुद्दा गाजत असताना महापालिकेने वारजे-कर्वेनगर मुख्य रस्त्यावरील बेकायदेशीर बांधकामावर हातोडा चालविला.

तीन हजार चाैरस फूट जागा मोकळी केली आहे. सामान्य नागरिकांनी त्याचे काैतुक केले.

नागरिकांकडून स्वागत

महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने वारजे- कर्वेनगर मुख्य रस्त्यावरील बेकादेशीर बांधकामावर केलेल्या सहा व्यावसायिक दुकानांवर शुक्रवारी कारवाई केली.

यामध्ये सुमारे तीन हजार चौरस फूट जागा रिकामी केली आहे. तासभर झालेल्या कारवाईत स्थानिकांचा विरोधास न जुमानता मागील अनेक वर्षापासून रखडलेल्या या कारवाईचे स्थानिकांनी स्वागत केले.

दहा-बारा वर्षापासूनचे अतिक्रमण

वारजे जुना जकात नाका येथील सर्व्हे नंबर १७ (भाग) व हिंगणे सर्व्हे न ५१ (भाग) मध्ये महापालिकेच्या समाज कल्याण विकास कार्यालयासमोर अनेक बेकायदा टप-या मागील दहा- बारा वर्षांपासून सुरू होत्या.

याबाबत वारंवार नोटिसा देऊनही येथील अतिक्रमणधारक टपऱ्या काढत नव्हते. वारजे- कर्वेनगर मुख्य रस्त्यालगत असलेल्या जागेचा व्यावसायिक वापर होत होता. त्यामुळे कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतरची ही पहिली कारवाई होती.

मोठा फाैजफाटा

महापालिकेचे तीन कनिष्ठ अभियंता, उपअभियंता दोन पोलिस उपनिरीक्षक दोन जेसीबीसह व सुमारे तीस जणांचा फौजफाट्यासह महापालिकेचे अतिक्रमण कारवाई केली.

ही कारवाई उपअभियंता देवेंद्र पात्रे यांच्या नेतृत्वाखाली कनिष्ठ अभियंता सतीश शिंदे, विठ्ठल मुळे, संग्राम पाटील, सचिन जावळकर, अजित ववले यांनी केली.

वारजे माळवाडी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक शंकर खटके निरीक्षक अमृत मराठे यांच्या सोबत सुमारे ४० पोलिस कर्मचारी असा मोठा बंदोबस्त होता.